💡सीरम इन्स्टिटय़ूटच्या १२ ते १७ वर्षे वयोगटासाठीच्या कोव्होवॅक्स लशीचा आपत्कालीन वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. करोनाविषयक तज्ज्ञ समितीने गेल्या आठवडय़ात या वयोगटासाठी कोव्होवॅक्स लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरीची शिफारस केली होती़
💡त्यानुसार केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून ही मंजुरी मिळाली आहे. १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी सशर्त दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.
💡१२ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे दोन हजार ७०७ मुलांवरील दोन अभ्यासांमधील आकडेवारीनुसार कोव्होवॅक्स अत्यंत प्रभावी, रोगप्रतिबंधक, सुरक्षित असल्याचे औषध महानियंत्रकांकडे करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होत़े.
💡 १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेली कोव्होवॅक्स ही चौथी लस आह़े
💡१५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सरसकट लसीकरणाबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
💡लसीकरणाची अतिरिक्त गरज आणि लसीकरणासाठी लोकसंख्येच्या समावेशाची व्याप्ती किती वाढवायची, याबाबत सतत तपासणी केली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment