Sunday 27 March 2022

मुलद्रव्ये


निसर्गात एकूण ९२ मूलद्रव्ये सापडतात. या मूलद्रव्यांना त्यांच्या अणुकेंद्रकातील धनभारित कणांच्या संख्येएवढे क्रमांक दिले आहेत. या क्रमांकाला अणुक्रमांक असे म्हणतात. केवळ अणुक्रमांकानेही मूलद्रव्य ओळखले जात असले तरी मूलद्रव्यांना नावेही दिली जातात. ९२ अणुक्रमांकाच्या नंतरची मूलद्रव्ये शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या मिळवली आहेत. या सर्व मूलद्रव्यांची त्यांच्या अणुक्रमांकानुसार एक सारणी (तक्ता) बनविली आहे. तिला ‘आवर्त सारणी’ (पिरियॉडिक टेबल) असे म्हणतात.

आपल्या सर्वाना हे माहिती आहे कि द्रव्य हे संयुग किंवा मिश्रणे  या स्वरूपात आढळते. परंतु या मूलद्रव्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे वर्गीकरण आपण धातू व अधातू मध्ये केले. कालांतराने असे लक्षात आले कि काही मूलद्रव्ये धातू  आणि अधातू या दोघांचेही  गुणधर्म दाखवितात त्यांना धातूसादृश्य असे म्हणतात . ज्या  मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता  त्यांची नावे लक्षात ठेवणे कठीण होते. या सर्व गोंधळातून बाहेर पडण्यासाठी शास्त्रज्ञानासुद्धा बरीच कसरत करावी लागली.परंतु अथक प्रयत्नानंतर जे समोर येत गेले त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत .

डोबेरायनर ची त्रिके

डोबेरायनर या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांचा अभ्यास करताना असे लक्षात आले कि काही काही  मूलद्रव्यांचे गुणधर्मांची पुनरावृत्ती होते आहे. मग ज्या मुलद्रव्याची  पुनरावृत्ती होते आहे ते गट त्याने शोधले.त्या गटांत  तीन मुलद्रव्ये होती म्हणुन त्यांना त्रिके असे संबोधले जाते.

डोबेरायनर ची त्रिकांचा नियम पुढीलप्रमाणे :-

 कोणत्याही तीन मुलद्रव्यांची मांड्णी करताना  मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे पहिल्या व तिसऱ्या  मुलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या बेरजेच्या सरासरी एवढे असते.

उदाहर्णार्थ
समजा तीन मूलद्रव्ये आहेत लिथियम,सोडीअम आणि पोटॅशियम या तीन मुलद्रव्यांची अणुवस्तुमान अनुक्रमे ६.९,२३,३९ आहेत. आता वरील नियमानुसार मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान काढू
पहिल्या व तिसऱ्या मुलद्रव्याची बेरीज करू  ६.९+३९=४५.९
सरासरी काढू  ४५.९/३=२२.९५ म्हणजेच २३ आता बघा मधला मूलद्रव्य सोडिअम याचे अणूवस्तुमान २३ आहे . परंतु अभ्यासानंतर असे लक्षात आले कि हा नियम सगळ्या मूलद्रव्यांना लागू पडत नव्हता. म्हणून या त्रीकांच्या नियमाला मान्यता मिळाली नाही .

No comments:

Post a Comment