COMBINE 2021 आणि आपण
अभ्यास चांगला होता. पण त्या एका तासात manage करू शकलो/शकले नाही.
अर्ध्या तासानंतर खूप ताण आला. अक्षरशः हात कापू लागला.
गडबडीत उलट सुलट bubling झाले. अशा प्रश्नांची संख्या 8 ते 10 होती.
2015 ची राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व सुटली होती मात्र त्यांनतर कोणतीच Exam यश नाही. 2022 संयुक्त ला आयुष्यातील सर्वात कमी स्कोअर. अगदी 19.
Yes, हे लोक अभ्यास करणारे आहेत. त्यांना आपल्या चुका सुध्दा माहित आहेत. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती. काही ज्युनिअर मागून पुढे चालले. मागील काही Exams मद्ये Cut off पासून 4/5 मार्क्स नी माघे राहतात. अस होण्याची कारणे त्यांना माहीत असतात मात्र तरी अधोरेखित करतो...
तेच. तुम्ही अभ्यास करत आहात. पण तो ज्याला टिच्चून म्हणतात तसा नाहीच. तुम्ही seasonal / हंगामी स्वरूपात अभ्यास करता. दीर्घ काळ तुमची प्रायोरिटी MPSC नसते. एक दोन दिवस तुम्हाला महत्वाचे वाटत नाही. दिवसातील 2/3 तासाचे महत्व तुम्हाला उमगलेले नाही आहे. अभ्यासात काही ना काही कारणाने चढउतार असतात. समजा 26 Feb ला पेपर होतो. त्याच दिवशी त्याचेवर काम होणे अपेक्षित असते. तो पेपर नकळत अडगळीत पडतो. अभ्यासावर कदाचित बोलता जास्त तुलनेने करता कमी. तुमचे ताण घेण्याचे दिवस म्हणजे Exam आठवडा, परीक्षेचा दिवस, तो तास, की चा दिवस आणि रिझल्ट चा दिवस.
उरलेले सर्व दिवस मग सारखेच. लायब्ररी, मेस, चहा, मित्र, फोनाफोनी. विना टेन्शन जिंदगी. एमपीएससी हीच फर्स्ट प्रायोरिटी फक्त म्हणायला. वास्तविक जगात MPSC ची जागा
चौथ्या पाचव्या क्रमांकावर पण असते का हा प्रश्न पडावा. नंतर add ची प्रतीक्षा. फॉर्म भरण्याचे सोपस्कर. नंतर ये रे माझ्या मागल्या....विंदांच्या भाषेत सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते...तेच ते!
अर्थात हा सगळाच वर्ग असा असेल असे पण नाही. मात्र तो नक्कीच हंगामी असतो. Exam आलेवरच अभ्यास करणारा असा सर्वसाधारण अर्थ. मी त्यापलीकडे जावून सांगेन एकदा MPSC ध्येय असेल तर तो प्रवास 2/3/4/5 वर्षाचा सुध्दा असू शकतो. तर या संपूर्ण प्रवासात तशीच गंभीर गरज नसताना तुम्ही सहजच एक दोन दिवस वाया घालवू शकता तर तुम्ही हंगामी अभ्यास करणारेच आहात.
असं कोठे असू शकते का? असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला न पाहता, न ओळखता देखील मी ठामपणे सांगू शकतो की, तुमचा प्रवास मग अनिश्चित आहे. अंधार आहे. तुमचा हाच दृष्टिकोन तुम्हाला नडतो आहे, भविष्यात नडेल. स्कोअर काढणारे बहुसंख्य काय कष्ट घेतात हे तुम्हाला सहज दिसणार नाही. त्याला खूप मोठ्या भिंगाचा चष्मा लावून उपयोग नाही, अंतर्मनातील जळमटे जी दृष्टीकोन बिघडवतात ती दूर करणे आवश्यक. ती देखिल त्वरित, ताबडतोब आणि तात्काळ!
No comments:
Post a Comment