Saturday, 26 March 2022

ऑपरेशन आहट

✅ RPF ने ऑपरेशन आहट सुरू केले आहे.

✅ मानवी तस्करी रोखण्यासाठी (prevent human trafficking) रेल्वे संरक्षण दलाने (Railway Protection Force RPF) ऑपरेशन आहट सुरू केले आहे.

❄️ महत्वाचे मुद्दे

✅ यामध्ये प्रामुख्याने सीमावर्ती देशांमधून धावणाऱ्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

✅ हे ऑपरेशन रेल्वे मंत्रालयाकडून केले जात आहे.

✅ ऑपरेशनचा एक भाग म्हणून, RPF लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विशेष दल तैनात करेल.

✅ या ऑपरेशनमध्ये प्रामुख्याने महिला आणि मुलांची तस्करांपासून सुटका करण्यावर भर असेल आणि भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये हे ऑपरेशन राबविण्यात येईल.

✅ या कारवाईअंतर्गत RPF कडून सुगावा गोळा करणे, जुळवणे आणि त्याचे विश्लेषण करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

✅ याअंतर्गत मार्ग, बळी, स्रोत गंतव्य स्थाने, लोकप्रिय गाड्या यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

✅ या मोहिमेअंतर्गत सायबर सेल तयार करण्यात येणार आहेत.

✅ या ऑपरेशनमध्ये म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश येथून निघणाऱ्या गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

No comments:

Post a Comment