समाजातील मानवी वागणुकीचा, वर्तनाचा, हालचालींचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात.
समाजात एकत्रित राहत असताना मानव अनेक प्रकारची वागणूक, हालचाल करीत असतो.
उदा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक इ. अनेक प्रकारच्या हालचाली, वागणूक मानव करीत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वागणुकीचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांनी वाटून घेतलेला दिसतो. त्यानुसार समाजातील या वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात.
No comments:
Post a Comment