Saturday, 26 March 2022

नाम – सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम. नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत

A) सामान्य नाम
B) विशेष नाम
C) भाववाचक नाम

A) सामान्य नाम –

असेल त्यास सामान्य नाम म्हणतात.

उदा० – मुलगा, माणूस, ग्रह, तारे, शहर, गाव इत्यादी.

सामान्य नामाचे २ प्रकार :

1. पदार्थ वाचक – जे घटक शक्यतो लिटरमध्ये, मीटरमध्ये किंवा ग्रॅममध्ये मोजले जातात, त्यांना पदार्थ वाचक नाव म्हणतात

उदा० – दूध, तेल, पाणी, कापड, गहू, सोने, चांदी इत्यादी

2. समूह वाचक – ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात .

उदा – मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.

B) विशेष नाम –

ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात.

उदा० – शिवाजी, ताजमहाल, पृथ्वी, गोदावरी, इत्यादी.

( टीप – विशेष नाम हे व्यक्ती वाचक व एकवचनी असतात उदा – सागर)

C) भाववाचक नाम/धर्म वाचक नाम –

ज्या नामाच्या योगाने गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाव म्हणतात, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नामाला भाववाचक नाम म्हणतात.

उदा – गरिबी, सौंदर्य, शत्रुत्व, गर्व, थकवा, इत्यादी.

भाववाचक नामाचे ३ प्रकार

1) गुणदर्शक – सौंदर्य, प्रामाणिकपणा, चतुराई/चातुर्य

2) स्थितिदर्शक – गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र्य

3) कृतिदर्शक – चोरी, चळवळ, क्रांती

प्रत्यय वापरून तयार झालेले भाव वाचक नामे

य : सुंदर – सौंदर्य, गंभीर – गांभीर्य, शूर – शौर्य, नवीन – नावीन्य, चतुर – चातुर्य

त्व : शत्रू – शत्रुत्व, मित्र – मित्रत्व, प्रौढ – प्रौढत्व, नेता – नेतृत्व

पण / पणा : देव – देवपण, बाळ – बालपण, शहाणा – शहाणपण

ई : श्रीमंत – श्रीमंती, गरीब – गरिबी, गोड – गोडी

ता : नम्र – नम्रता, वीर – वीरता, बंधू – बंधुता

की : पाटील – पाटीलकी, माल – मालकी, गाव – गावकी

गिरी : गुलाम – गुलामगिरी, दादा – दादागिरी, फसवा – फसवेगिरी

वा : गोड – गोडवा, गार – गारवा, ओला – ओलावा

आई : नवल – नवलाई, चपळ – चपळाई, चतुर – चतुराई

वी : थोर – थोरवी

A. सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :

आमच्या पोपट कालच गावाला गेला.
आत्ताच तो नगरहून आला.
आमची बेबी नववीत आहे.

B. विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :

आमची बायको म्हणजे लक्ष्मी.
तुमची मुलगी त्राटिकाच दिसते.
आईचे सोळा गुरूवारचा व्रत आहे.

नाम म्हणजे- एखाद्या गोष्टीचे नाव :-

C. भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :

शांती माझ्या भावाची मुलगी आहे.
माधुरी सामना जिंकली.
विश्वास परीक्षेत पास झाला.

D. धातुसाधित नाम : धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्यास धातुसाधित नाम म्हणतात

त्याचे वागणे चांगले नाही.
ते पाहून मला रडू आले.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...