Saturday, 26 March 2022

अग्नि-प्राईम’ची यशस्वी चाचणी


‘डीआरडीओ’ने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) शनिवारी आण्विक क्षमता असलेल्या अत्याधुनिक अग्नि-प्राईम या क्षेपणास्त्राची ओडिशा किनाऱ्यानजीकच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी केली. या वर्षी जूननंतर दुसऱ्यांदा ही क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे.
    केंद्र सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या क्षेपणास्त्राने अपेक्षित सर्व निकषांची पूर्तता करीत आपले लक्ष्य अत्यंत अचूकपणे साध्य केले. हे क्षेपणास्त्र दोन टप्पे असलेले आणि दुहेरी मार्ग आणि मार्गदर्शक प्रणालीने सज्ज आहे. या क्षेपणास्त्राच्या यंत्रणेतील सर्व अत्याधुनिक प्रणालींची द्वितीय उड्डाण चाचणी अपेक्षेनुसार यशस्वी ठरली आहे. हे क्षेपणास्त्र अग्नी वर्गातील क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे. एक हजार ते दोन हजार किलोमीटर इतका पल्ला गाठण्याची त्याची क्षमता आहे. अग्नी ५ हे भारताचे सर्वाधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ते पाच हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.
अग्नि-प्राईमच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...