Wednesday, 23 March 2022

तेल आयातीच्या भारताच्या ‘स्वतंत्र’ धोरणाचे इम्रान खान यांच्याकडून कौतुक

🔥अमेरिकेच्या निर्बंधांची तमा न बाळगता भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याचे सांगून, ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे’ पालन करत असल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी भारताची प्रशंसा केली.

🔥पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे कडवे टीकाकार असलेले खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभरून कौतुक केले.

🔥आपला शेजारी देश असलेल्या भारताचे ‘स्वतंत्र परेराष्ट्र धोरण’ असल्याबद्दल आपण त्याची प्रशंसा करू इच्छितो, असे खैबर- पख्तुन्ख्वा प्रांतात एका जाहीर सभेत केलेल्या भाषणात खान यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून सांगितले.

🔥‘क्वाड’चा भाग असलेल्या भारताने अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही रशियाकडून तेलाची आयात केली, असे ते म्हणाले. आपले परराष्ट्र धोरण पाकिस्तानच्या लोकांना धार्जिणे असल्याचेही पंतप्रधान खान यांनी नमूद केले. ‘मी कुणासमोर झुकलेलो नाही आणि माझ्या देशालाही झुकू देणार नाही’, असे येत्या आठवडय़ात संसदेत विश्वासदर्शक ठरावापूर्वी जनमताचा पाठिंबा मिळवू पाहणाऱ्या खान यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment