Wednesday, 23 March 2022

आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर

💠इंडियन प्रीमियर लीग  (आयपीएल) या जगातील सर्वात मोठय़ा आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून यावेळी पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर केला जाणार आहे.

💠‘आयपीएल’चे प्रसारण करणारी वाहिनी स्टार स्पोर्टसचा तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिकाधिक भर असून सामन्यांदरम्यान समालोचकांना संघांविषयी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी यंदा ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानवाचा (रोबो स्टॅटिस्टीक्स) वापर केला जाईल. याबाबतची माहिती डिस्ने स्टारच्या क्रीडा विभागाचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी दिली.

💠‘‘आम्ही ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानव तयार केला आहे. तो समालोचकांचे साहाय्य करेल. आमच्या समालोचकांना विराट कोहली ‘आयपीएल’मध्ये एखाद्या प्रकारच्या चेंडूवर किती वेळा बाद झाला आहे, याची माहिती पाहिजे असल्यास ते ‘क्रिको’ला याबाबत विचारू शकतील. तो ३० सेकंदात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.

💠तसेच यंदा पहिल्यांदाच सर्व ७४ सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन केले जाईल. संदीप पाटील, अमोल मुझुमदार, स्नेहल प्रधान आणि विनोद कांबळी यांसह अन्य काही जण समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. यंदाच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने महाराष्ट्रात होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...