🔹👉 महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
🔸दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.
🔹भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला.
🔸८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.
🔹पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले.
🔸काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.
🔹इटलीमध्ये या दिवशी पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.
🔸थीम 2022 : 'Gender Equality Today for a Sustainable Tomorrow' ✅
No comments:
Post a Comment