Sunday, 27 March 2022

अर्थतज्ज्ञ मराठी माहिती

बाबासाहेब आंबेडकर, ॲडम स्मिथ, जॉन मेनार्ड केन्स, कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो, मिल्टन फ्रिडमन, पॉल क्रुगमन, पॉल सॅम्युलसन, अमर्त्य सेन, जोसेफ स्टिग्लिट्झ इत्यादी अर्थशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहेत.

ॲडम स्मिथ याच्यापासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरूवात झाली. भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याने पुरस्कार केला. "बाजारपेठेतील  घटकावर कुठलेही  नियंत्रण ठेवु नये. या घटकावर बाजारच स्वतः नियंत्रण ठेवत असतो" असे मत त्याने मांडले ,जणू काही बाजाराला स्वतःचा एक अदृश्य हात असतो असा सिद्धांत त्याने मांडला. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या १७७६ मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती (इंक्वायरी ॲन्ड कॉसेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स) या ग्रंथात मांडली आणि त्यांच्यामते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे.

ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे:

निर हस्तक्षेपाचे धोरण
भांडवल व संपत्तीचा साठा
आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम
वृद्धीच्या सिद्धांतामध्ये "श्रमविभाजन" या विशिष्ट पैलूला महत्त्व
सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धांची संकल्पना व गट संकल्पना या सिंबार्लिनने पहिल्यांदा मांडल्या. माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन अंकगणिती श्रेणीने वाढते, तर लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते. प्रा मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे (प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स) हे पुस्तक १८९० साली प्रकाशित केले. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो.

मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे:

अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास
अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र
अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास
अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...