Thursday 31 March 2022

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा (महिला) - महाराष्ट्राच्या महिला संघाचा दोन वर्षांनी बाद फेरीत प्रवेश.

📕महाराष्ट्राच्या महिला संघाने शुक्रवारी साखळी सामन्यांत तेलंगण आणि चंडीगड या संघांवरील दोन विजयांसह फ-गटातून बाद फेरीतील प्रवेश केला. पाटणा आणि जयपूर येथे झालेल्या गेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचा संघ साखळीतच गारद झाला होता.

📕महाराष्ट्राने सायंकाळच्या सत्रात चंडीगडला ४०-१८ असे सहज नमवले. या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावातच २३-१३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आणखी जोरदार खेळ करीत १७ गुणांची भर टाकली. महाराष्ट्राच्या या विजयात स्नेहल शिंदेच्या धारदार चढायांचा मोलाचा वाटा आहे. तिने एकाच चढाईत ४ गडी टिपण्याचा पराक्रम केला. पूजा यादवची तिला चढाईत तर सायली केरीपाळे, पूजा शेलार यांची पकडींची साथ लाभली.

📕त्याआधी, सकाळच्या सत्रात महाराष्ट्राने तेलंगणावर ४८-१४ असा दिमाखदार विजय नोंदवला. मध्यंतराला महाराष्ट्राने २६-१० अशी आघाडी घेतली होती. शनिवारी महाराष्ट्राची शेवटची साखळी लढत छत्तीसगडशी होईल.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...