Sunday, 27 March 2022

महत्त्वाचे प्रश्न


❇️सतीबंदी कायद्याच्या निवेदनावर राममोहन रॉय व ...... यांची सही होती.
- जगन्नाथ शंकर शेठ (मुंबईतील व्यक्ती)

❇️ गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक........ - -गो. ग. आगरकर.

❇️ बालविवाहावर टिका करून, स्वयंवर पद्धतीचा आग्रह .... यांनी धरला.
-गो. ग. आगरकर (स्त्रीशिक्षणाचा आग्रह)

❇️मराठा सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध लेखन....?
- न्या.म. गो. रानडे (या लेखनामुळे इतिहासतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख)

❇️छ. शाहूंनी ...... यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली.
-डॉ. कृष्णाबाई केळवकर (१९०२ मध्ये महिला डॉक्टर म्हणून कोल्हापूर येथे नेमणूक)

❇️भगवंतराव पाळेकरांनी जागृती येथून सुरू केले. - बडोदा येथून (२५ ऑक्टोबर १९१७)

❇️विजय मराठा हे पुण्यातून यांनी सुरू केले होते? -श्रीपतराव शिंदे (१ डिसेंबर १९१९)

❇️छ. शाहूंनी..... यांना शिवचरित्र लिहिण्यास २००० रु. ची मदत देवू केली ?
-कृष्णाजी अर्जुन केळुस्कर (मराठा समाजातील व्यक्ती)

❇️सेवासदनच्या संस्थपिका ..... या होत. - रमाबाई रानडे (पूर्वीचे नांव - यमुनाबाई चिपळूणकर)

❇️......ही मराठीतील पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. यामध्ये विधवांच्या दुःस्थितीबाबत वर्णन केले आहे ती ओळखा. - यमुना पर्यटन-बाबा पद्मनजी (१८५७ मध्ये लेखन)

❇️.....१८७२ मध्ये यांनी स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली? न्या. म. गो. रानडे.

❇️सन १९०५ मध्ये तरूण अस्तिकांचा संघ .....
यांनी स्थापला.
-महर्षी वि. रा. शिंदे - तरूण ब्रह्मसंघ (पत्राद्वारे धर्मप्रसारासाठी)

❇️ युवक ब्राह्मोसंघाची स्थापना कोणी केली?
- वि. रा. शिंदे, १९२३ मध्ये, प्रार्थना समाजातून जावून ब्राह्मो समाजात कार्य)

❇️ 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा प्रबंध वि. रा. शिंदेनी..... येथून प्रसिद्ध केला. - कोल्हापूर १९३३

❇️पं. श्या. कृ. वर्मांची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून .... हे इंग्लंडला बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी गेले होते? - वि. दा. सावरकर.

❇️ स्त्री-पुरुष तुलना नावाचे पुस्तक कोणी लिहिले? - ताराबाई शिंदे १८८२

❇️अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाचे लेखन..... यांनी केले. - महात्मा फुले.

❇️सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य .... केले. - मोरो विठ्ठल वाळवेकर.

❇️ सन १९२७ मध्ये जेधे जवळकर या नावाची पुस्तिका कोणी लिहिली?- अच्युत बळवंत कोल्हटकर.

❇️ दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना .... यांनी केली.
- कृष्णराव भालेकर-१८८४ (दीनबंधू वृत्तपत्र चालविले)

❇️पुण्यात महिला सेवा मंडळातर्फे ..... यांनी १८५२ मध्ये महिला तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता.-सावित्रीबाई फुले (सार्वजनिक तिळगुळ वाटप कार्यक्रम, अध्यक्षा-ई. जी. जोन्स)

❇️ भांबुर्डे येथे हितोपदेशक भजन समाज व छोटे ग्रंथालय .......यांनी सुरू केले.
- कृष्णराव भालेकर (पुणे सुशिक्षणगृहाची स्थापना केली होती.)

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...