Saturday, 19 March 2022

प्रो लीग हॉकी (पुरुष) - अर्जेटिनाविरुद्धच्या लढतीत भारताचे प्रयोगाचे धोरण.

🌅‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी स्पर्धेत दुसरा पराभव पत्करल्यानंतरही भारतीय पुरुष संघाने व्यग्र हंगामाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या फळीतील खेळाडूंना अजमावत प्रयोगाचे धोरण कायम ठेवले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भारतीय संघ अर्जेटिनाविरुद्धच्या दोन लढतींपैकी पहिला सामना शनिवारी खेळणार आहे.

🌅किलगा स्टेडियमवर स्पेनविरुद्ध झालेल्या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताने ५-४ असा विजय मिळवला, परंतु दुसऱ्या सामन्यात ३-५ अशी हार पत्करली. याआधी गेल्या महिन्यात भारताने फ्रान्सकडून २-५ असा पराभव पत्करला होता. मात्र तरीही भारतीय संघ १२ गुणांसह नेदरलँड्स (१६ गुण) पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत चार विजय मिळवले आहेत.

🌅येत्या वर्षांत राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धाची महत्त्वाची आव्हाने भारतापुढे आहेत. या स्पर्धाना २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राखीव खेळाडूंनाही संधी देण्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी ठरवले आहे.

🌅स्पेनविरुद्धच्या लढतीमधील भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरील अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात भारताचा कनिष्ठ विश्वचषक खेळलेला मध्यरक्षक मोयरंगथेम रबिचंद्रन पदार्पण करणार आहे.

🌅दुखापतीतून सावरलेला गरुजत सिंगसुद्धा या सामन्यात पुनरागमन करणार आहे. गोलरक्षक क्रिशन बहादूर पाठक हा सूरज करकेराची जागा घेईल. बचावफळीत मनदीप मोर आणि दीपसन तिर्की यांच्या जागी अमित रोहिदास आणि जुगराज सिंग खेळतील. मध्यफळीत जसकरण सिंग आणि अक्षदीप सिंग यांच्या जागी सुमित आणि रबिचंद्र खेळतील.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...