Sunday, 13 February 2022

आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गृह अलगीकरणातून मुक्तता; १४ फेब्रुवारीपासून नवी नियमावली.

🔰जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांना आता करोना चाचणी करणे अनिवार्य नाही. प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी ७२ तास आधी करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आता आवश्यक नाही. प्रवासी केवळ लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवू शकतात.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवस गृहअलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही. १४ दिवस त्यांच्या आरोग्याची देखरेख ते स्वत:च करतील.

🔰प्रवास केल्यानंतर आठ दिवसांनी करोना चाचणी करणे अनिवार्य नाही आणि चाचणीचा अहवाल सरकारी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक नाही. त्याऐवजी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड करू शकता.

🔰विमानातील दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर पडण्यास परवानगी देण्यात येणार असून त्यांना चाचणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. ८२ देशांतील संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना ‘अलगीकरण मुक्त’ प्रवेश देण्यासाठी हे नियम लागू आहेत.

No comments:

Post a Comment