Sunday, 13 February 2022

क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा - लुकाकूच्या गोलमुळे चेल्सी अंतिम फेरीत.

🔰आघाडीपटू रोमेलू लुकाकूने केलेल्या गोलच्या बळावर चेल्सीने अल हिलाल संघावर १-० अशी मात करत क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

🔰युरोपीय संघांनी या आंतरखंडीय स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून मागील १४ पैकी १३ अंतिम सामन्यांत बाजी मारली आहे. अंतिम फेरीत पराभूत होणारा चेल्सी हा एकमेव संघ आहे. २०१२ मध्ये त्यांच्यावर ब्राझीलमधील संघ कोरिन्थिन्सने मात केली होती. यंदा मात्र चेल्सीला ही स्पर्धा जिंकण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. शनिवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे ब्राझीलमधील संघ पाल्मेरेसचे आव्हान असेल.

🔰तत्पूर्वी, बुधवारी रात्री उशिराने झालेल्या लढतीत अल हिलालने चेल्सीला चांगली झुंज दिली. अल हिलालने भक्कम बचाव करतानाच आक्रमणात गोलच्या काही संधी निर्माण केल्या. मात्र, चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलागाने अप्रतिम खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखले. दुसरीकडे ३२व्या मिनिटाला काय हावेत्झच्या पासवर लुकाकूने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अखेर हाच गोल त्यांच्या विजयात निर्णायक ठरला.

No comments:

Post a Comment