Thursday, 3 February 2022

फेसबुक मेटाच्या डेटा सायन्स वर्कप्लेसमध्ये भारतीय व्यक्तीची प्रमुख म्हणून नियुक्ती.

🔰गेल्या वर्षी जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदलून मेटा असं केलं. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

🔰त्यानंतर आता मेटाने अर्पित अग्रवाल यांची कंपनीच्या लंडन कार्यालयात डेटा सायन्स, वर्कप्लेसचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. अग्रवाल डेटा सायन्स डोमेनच्या आसपासच्या नवीन कल्पनांसाठी काम करणार आहेत.

🔰मेटामध्ये सामील होण्यापूर्वी, अग्रवाल यांनी बंगळुरूस्थित फिनटेक स्टार्टअप खातबुकमध्ये अॅनालिटिक्स आणि डेटा सायन्स म्हणून दीड वर्ष काम केले. या भूमिकेत, त्यांनी डेटा अॅनालिटिक्स टीमचे नेतृत्व केले आणि खातबुकसाठी क्रॉस-फंक्शनल अॅनालिटिक्स आणि डेटा सायन्ससाठी काम केले.

🔰व्यवसायाच्या वापरासाठी डेटाचा लाभ घेण्याच्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेसह, अग्रवाल यांनी सर्व व्यवसायिकांना सक्रिय डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत केली ज्यामुळे लक्षणीय वाढ आणि महसूल मिळाला.

No comments:

Post a Comment