Thursday, 3 February 2022

क्रीडा क्षेत्राला बूस्टर ; आगामी आर्थिक वर्षांसाठी ३०५.५८ कोटी रुपयांची वाढ.

🔰गतवर्षी झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद मंगळवारी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा अर्थसंकल्पावर उमटले. २०२२-२३ या वर्षांत क्रीडा क्षेत्रासाठी ३०६२ कोटी, ६० लाख रुपयांची तरतूद करताना मागील वर्षांपेक्षा ३०५ कोटी ५८ लाख रुपयांची वाढ केली आहे.

🔰करोना साथीच्या फैलावामुळे गतवर्षी क्रीडा अर्थसंकल्पात २३०.७८ कोटी रुपयांची कपात करण्यात आली होती. परंतु यंदा खेलो इंडिया, राष्ट्रीय युवा योजनांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. २०२१-२२च्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २५९६ कोटी, १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर २७५७ कोटी, २ लाख रुपये इतकी सुधारित तरतूद केली गेली.

🔰टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने विक्रमी सात पदकांची कमाई केली. तसेच अन्य क्रीडा प्रकारांतही भारताने उत्तम कामगिरी केली. त्याशिवाय या वर्षांत राष्ट्रकुल, आशियाई यांसारख्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रीडा क्षेत्राच्या यशासाठी लक्ष पुरवले आहे.

No comments:

Post a Comment