Thursday 3 February 2022

कोविडच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली एक गोष्ट दाखवावी” केंद्रीय मंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका.

🔰करोनाकाळात केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ठोस मदत दिली जात नाही. केंद्रीय पथके राज्यात पाहणीसाठी येतात आणि केवळ सूचना करुन निघून जातात. महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात लसही पाठवली जात नाही, अशा टीका वारंवार ठाकरे सरकारने केंद्र सरकारवर करोनाकाळात केल्या होत्या.

🔰त्यानंतर राज्यात भाजपा नेत्यांनी हे आरोप फेटाळत केंद्र सरकारची पाठराखण करत महाराष्ट्र सरकार काहीच करत नसल्याचे म्हटले होते. त्यांनतर आता पुन्हा भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

🔰 “आजचा दिवस हा देशासाठी महत्त्वाचा आहे. भारत समृद्ध होण्यासाठी, मोदींच्या नेतृत्वाखाली देश विश्वगुरु बनण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. महाविकास आघाडी नेहमीच चुकीचे बोलते. स्वतः काही करत नाही फक्त केंद्राकडे बोट दाखवणे हेच त्यांचे काम आहे. कोविडच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली एक गोष्ट दाखवावी.

🔰केंद्र सरकारने केलेल्या १० गोष्टी मी सांगू शकतो. आम्ही आमची लस देऊ असे महाराष्ट्र सरकारने सांगितले होते पण त्यांनी कोणती लस दिली? केंद्राने १५० कोटी लोकांसाठी लस दिली आहे पण महाराष्ट्र विकास आघाडीने काही केलेले नाही,” अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...