मझगाव डॉक्स लिमिटेड (MDL) कंपनीने 28 ऑक्टोबर 2021 रोजी “Y 12704 (विशाखापट्टणम)” या नावाचे विनाशिका जहाज भारतीय नौसेनेकडे सोपविले.
🔰“Y 12704 (विशाखापट्टणम)” हे “प्रोजेक्ट 15B” अंतर्गत देशातच तयार करण्यात आलेले देशी बनावटीचे स्टेल्थ गाईडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर जहाज आहे.
🔰ठळक बाबी
“Y 12704 (विशाखापट्टणम)” ही मझगाव डॉक्स लिमिटेड (MDL) या सार्वजनिक जहाजबांधणी कंपनीकडून भारतीय नौसेनेसाठी बांधण्यात येत असलेल्या 4 स्टेल्थ गाईडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर युद्धनौकांपैकी एक आहे. या युद्धनौकांना देशाच्या चारही कोपऱ्यांतील प्रमुख शहरांची (मोरमूगाव, इंफाल, विशाखापट्टणम आणि सुरत) नावे देण्यात आली आहेत.
या युद्धनौका मागील दशकात तैनात करण्यात आलेल्या “कोलकाता” श्रेणीच्या (प्रोजेक्ट 15A) युद्धनौकांना बदलण्यासाठी तयार करण्यात येत आहे.
या युद्धनौकेची लांबी 163 मीटर इतकी आहे, जी एकूण 7400 टन भार वाहून नेण्याची क्षमता ठेवते. युद्धनौकेचा कमाल वेग 30 नॉट्स आहे. त्या अत्याधुनिक संरक्षण उपकरणांनी सुसज्जित आहेत.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
No comments:
Post a Comment