संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याद्वारे युरोपिय संघाच्या पाठिंब्याने “आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळा (IMEO)’चे उद्घाटन करण्यात आले आहे. ग्लासगो (ब्रिटन) येथे आयोजित करण्यात आलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान IMEOचे अनावरण करण्यात आले.
🔰मिथेन वायू वर्तमानात वैश्विक तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये किमान एक चतुर्थांश भागासाठी जबाबदार आहे. त्यामुळे वायुच्या उत्सर्जनावर लक्ष ठेवण्याच्या कार्यामध्ये IMEOची मदत होणार आहे.
🔰ठळक बाबी
ही नवीन वेधशाळा हरितगृह वायू असलेल्या मिथेन वायूच्या पातळीवर लक्ष ठेवण्याचे कार्य करणार आहे. IMEO याला जगभरातील कंपन्या आणि सरकारांना धोरणात्मक शमनक्रियेवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी आणि विज्ञान-आधारित धोरण पर्यायांना समर्थन देण्यासाठी या माहितीचा वापर करण्यास अनुमती देईल.
मानवी क्रियाकलापामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायुच्या पातळीविषयी स्पष्ट आणि अचूक माहिती पुरविण्यात IMEO अहवालाची मदत होणार आहे. IMEO सुरुवातीला जीवाश्म इंधनाच्या क्षेत्रातून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनावर लक्ष केंद्रित करेल आणि कालांतराने कृषी आणि कचरा यासारख्या इतर प्रमुख उत्सर्जन क्षेत्रांपर्यन्त कार्यविस्तार करेल.
🔰ताज्या ‘UNEP-CCAC ग्लोबल मिथेन असेसमेंट’ अहवालानुसार, शून्य किंवा कमी निव्वळ-किंमत कपात ही मानवी क्रियाकलापामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनची पातळी जवळजवळ निम्मी करू शकते आणि सिद्ध उपाययोजना 2050 सालापर्यंत ग्रहाच्या सरासरी वैश्विक तापमानात अंदाजित वाढीपासून 0.28 अंश सेल्सिअसने कमी करू शकतात.
🔰संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) विषयी
हा संयुक्त राष्ट्रसंघाचा एक अंग असून ते प्रमुख जागतिक पर्यावरण प्राधिकरण आहे. ही संस्था जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पातळीवर कार्य करते. संस्थेची 5 जून 1972 रोजी स्थापना झाली. संस्थेचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
No comments:
Post a Comment