Sunday, 9 January 2022

कायमची बंदी घालणाऱ्या Twitter ला डोनाल्ड ट्रम्प यांचं सडेतोड प्रत्युत्तर; तयार केला नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म.


🔰अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) हे त्यांचं नवं अ‍ॅप फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार आहे.


🔰२१ फेब्रुवारीपासून ‘ट्रुथ सोशल’ अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध असेल. हे अ‍ॅप ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) द्वारे बनवले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही नवीन मीडिया कंपनी अमेरिकेचे माजी रिपब्लिकन डेव्हिन नुनेस यांच्या नेतृत्वाखाली आहे.


🔰टरुथ सोशल अ‍ॅप हे ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसारखंच दिसत आहे. प्रोफाइल पेज जवळजवळ ट्विटर अ‍ॅपसारखे दिसत आहे आणि पोस्टमध्ये प्रत्युत्तरे, रीट्विट्स, पसंती आणि शेअरिंगसाठी चिन्हे दिसत आहेत.


🔰जयांनी माझ्यावर बंदी घातली अशा बिग टेक कंपनींच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण ट्रुथ सोशल मीडिया तयार केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबान ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे, तरीही तुमचे आवडते अमेरिकी अध्यक्ष शांत बसले आहेत, अशी खोचक टीकाही ट्रम्प यांनी त्यावेळी केली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...