Tuesday, 5 July 2022

🔴 PSI पूर्व परीक्षेसाठी 50 गुणांची गोळाबेरीज कशी कराल?

 ⭕ PSI पुर्व परीक्षा पास होणं तुलनेने सोपं असत कारण PSI च्या जागा STI- ASO पेक्षा जास्त असतात, बऱ्याच लोकांना PSI पदाची ची आवड नसते (विशेषतः मुलींना )तसेच PSI साठी लागणाऱ्या Physical आणि Medical Standards मुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरतात.

                                

⭕ Actually PSI चा Cutoff हा दरवर्षी around 45 असतो पण 50 हा Safe Score समजला जातो. 


♦️ माझ्या आत्तापर्यंतच्या निरक्षण आणि अनुभवावारून PSI साठी इच्छुक असणाऱ्या बऱ्याच  Candidates चा Score हा 40-45 दरम्यान असतो.हे विद्यार्थी बऱ्यापैकी Serious असतात अभ्यासदेखील करत असतात पण त्यांच्या चुका त्यांना नकळत समजत नाहीत.


♦️ तर आपण या चुका काही प्रमाणात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

     

1.Revision चे महत्व माहिती असूनही ते न केल्यामुळे  ऐन परीक्षेच्या वेळी सोपे -सोपे प्रश्न विद्यार्थी न आठवल्यामुळे चुकतात व Finally Score कमी येतो.


2. सोबतच प्रत्येक विषयामधला महत्वाचा घटक कुठला व कमी महत्वाचा घटक कुठला हे ओळखन्यामध्ये बरेच विद्यार्थी अपयशी ठरतात त्यामुळे अभ्यास करण्यात Unnecessary वेळ वाया जातो.


3. Unnecessary Attempt-


75-85 Attempt करून देखील तुमची Psi prelims निघू शकते त्यामुळे 100 प्रश्नांचा नाद करणे जमत नसेल तर Accuracy वर फोकस ठेवावा. 

                   

4. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असूनदेखील परीक्षेच्या अंतिम 15-20 दिवसात ते विद्यार्थी परीक्षा सोडून देतात . परीक्षेच्या काळात लागणार आत्मविश्वास आणि Temperament जो Manage करतो तोच परीक्षा पास होतो. त्यामुळे परीक्षेविषयी असणाऱ्या भीतीवर (अपयशाची )आत्त्तापासूनच काम करणे गरजेचे आहे.


5. 50-60% काठावर Score असलेल्या मुलांची पुर्व परीक्षा ही गणित बुद्धिमत्ता व विज्ञान या दोन विषयात कमी गुण मिळाल्यामुळे  जाते. त्यामुळे या 2 विषयांची जशी जमेल तशी जास्त तयारी करावी ( Class लावले तरी चालतील )


तर आपण 50 गुण मिळवण्याच्या साध्या आणि सोप्या 2 Strategy पाहू.


✔️  1. 7*7 Strategy-  


  पुर्व परीक्षेतील 7 ही विषयांना Average 7 गुण मिळवले तर आपण सहज 50 स्कोर करू शकतो.त्यामुळे पुर्व परीक्षेला सर्व विषयांना समान Weightage आणि Time दिला तर तुमची पुर्व परीक्षा आरामात निघू शकते.     

  पण एखाद्या विषयाला 7 पेक्षा कमी गुण आले तर ते दुसऱ्या विषयातून Cover व्हायला पाहिजेत.

तुमचा एखादा विषय weak असेल तरी पण चालेल पण एक पेक्षा जास्त weak नको.. कारण लिमिट पेक्षा जास्त marks cover होत नाहीत.. त्यामुळे योग्य विषयावर आपला वेळ आणि अभ्यासाची energy इन्व्हेस्ट करून आपण अपेक्षित score करू शकतो..


✔️ 2. Focused आणि Selective Strategy- 


 यामध्ये तुम्हाला Score करण्यास Easy असणारे 4-5 विषय निवडायचे आणि बाकी 2-3 विषयांची Average तयारी करायची.उदा. मी History, Geography, Polity, Ecomony आणि Current affairs या विषयांवर Focus करील आणि बाकी Science आणि Mathematics याला कमी वेळ देईल. तसेच  Time management साठी परीक्षेच्या किमान 1 महिना अगोदर किमान 15-20 सराव papers 50-55 मिनटात वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करावा.


 ही Strategy थोडीशी धोकादायक असली तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना लागू पडते. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रांतात खेळता येते आणि प्रॉपर study केला तर आरामात 50 score करता येतो.


❇️ तर अशा प्रकारे आपण पुर्व मध्ये गुण मिळवण्याच्या Strategy आणि अभ्यास्पद्धतीविषयी पुढेही बोलत राहू. 


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...