Wednesday 19 January 2022

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana)


प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली बैठकीत 10 मार्च 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेस मान्यता देण्यात आली.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश –

दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणार्‍या कुटुंबांना (BPL) नि:शुल्क LPG गॅसकनेक्शन उपलब्ध करून देणे.
भारतामध्ये स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे.
महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे व महिला सशक्तीकरण करणे.
प्रदूषण प्रमाण कामी करणे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2016 प्रासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील (BPL) महिलांना पहिले LPG कनेक्शन नि:शुल्क देण्यात आले.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारव्दारे पुढील 3 वर्षांमध्ये 5 कोटी कुटुंबांना नि:शुल्क LPG कनेक्शन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यावर 8 हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2016-17 मध्ये दीड कोटी कुटुंबास लाभ देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ इच्छित ग्राहकास जवळील GPL वितरकाव्दारे किंवा ऑनलाईन डाउनलोड करून अर्ज प्राप्त करता येतो. हा अर्ज भरून LPG वितरक केंद्रामध्ये जमा करावा. या दोन पानी अर्जामधील संपूर्ण माहिती उदा – नाव, पत्ता, आधारकार्ड नंबर, जनधन/बँक खाते इत्यादी भरणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...