Wednesday, 19 January 2022

IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्तम संस्था आहे: NIRF इंडिया रँकिंग 2021.


🧩केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)’ अंतर्गत ‘इंडिया रँकिंग 2021’ जाहीर करण्यात आली आहे.

🧩चेन्नई (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) याने ‘एकूणच’ तसेच ‘अभियांत्रिकी’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे.

💥इतर श्रेणी -

🧩विद्यापीठ तसेच संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू.
व्यवस्थापन श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद.
वैद्यकीय श्रेणीत प्रथम क्रमांक – अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली.
औषधीनिर्मिती / फार्मसी श्रेणीत प्रथम क्रमांक - जामिया हमदर्द.
महाविद्यालय श्रेणीत प्रथम क्रमांक - मिरांडा कॉलेज.वास्तुकलाशास्त्र श्रेणीत प्रथम क्रमांक - IIT रुडकी.

🧩विधी श्रेणीत प्रथम क्रमांक - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू.
दंत चिकित्सा श्रेणीत प्रथम क्रमांक - मणिपाल दंत विज्ञान महाविद्यालय, मणिपाल.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...