Thursday, 27 January 2022

स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड.....

🏏 भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे.

🏏 स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता.

🏏 पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही.

🏏 भारताच्या एकाही खेळाडूला ICCच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही.

🏏 स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८५५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही तिने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती.

🏏 पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची ICC प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान त्याने प्रथमच पटकावला आहे. तसेच शाहीन आफ्रिदी वर्षातील सर्वात तरुण खेळाडू आहे. (वयाच्या २१व्या वर्षी)

🏏 इंग्लंडचा कसोटी कप्तान जो रूट :  ICCचा कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर (पुरुष)

🏏 बाबर आझम : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष)

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...