Monday, 3 April 2023

Combine पूर्व ची घोडदौड...

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

✳️ प्रत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.
त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.
कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.
बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.
  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.
जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.

✳️ त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.
माझ्या माहितीप्रमाणे,
पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत
जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.
इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत
आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि  गणित आणि बुद्धिमत्ता.

1. राज्यशास्त्र-

राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे
पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.
राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.
एवढं मोठं पुस्तक पाहून बर्‍याच जणांना घाम फुटतो.
मग काही जणांना अडचण वाटते
त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.
यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे
कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात
उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या
राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.
ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे
जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल
निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.

2.भूगोल-

कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.
हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे.
स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत
आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.
ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.

3.अर्थशास्त्र-

यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.
अर्थशास्त्राच्या संदर्भात अनिकेत सरांनी मागील एक पोस्ट शेअर केली होती
ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.

4.विज्ञान-

इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते.
साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.
कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.
जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..
बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.
तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.
त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.
इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..

5. इतिहास-

सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.
पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.
तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.
इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.
त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.

6. चालू घडामोडी-

यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.
वारंवार रिव्हिजन करणे.
आणि पाठांतर करणे.
कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे
दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.

अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..

सर्वाना शुभेच्छा.!

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...