१. महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा (Kass Plateau) समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ (Suparba) या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे.
२. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या (Shekru) सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे (Tamhan) सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत.
३. चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या (Hariyal) प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या. शेवटच्या टप्प्यातील सुमारे 15 फुटाचं आंब्याचे झाड (mango tree) विशेष आकर्षक दिसत होते.
४. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू (butterfly) ‘ब्ल्यू मॉरमॉन’ची (Blue Mormon) आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली.
No comments:
Post a Comment