Wednesday, 12 January 2022

चिनी यानाकडून चंद्रावरील पाण्याचा थेट पुरावा

🔰चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होते, याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा चीनच्या चँग-५ यानास आढळला आहे. यातून पृथ्वीचा हा उपग्रह शुष्क कसा बनला, हे समजून घेणे शक्य होणार आहे.

🔰याबाबतचा अभ्यास शनिवारी सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार चीनचे हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले, तेथील पृष्ठभागावरील मातीमध्ये १२० पीपीएमपेक्षा कमी पाणी आहे. हे प्रमाण एक टन मातीमध्ये १२० ग्रॅम पाणी इतके आहे. त्याचप्रमाणे तेथील हलक्या सच्छिद्र खडकामध्ये १८० पीपीएमपेक्षा कमी पाणी दिसून आले आहे.

🔰पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या तुलनेत चंद्राचा पृष्ठभाग फारच शुष्क आहे.  चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे अस्तित्व हे दूरवरून निरीक्षणातून निश्चित करण्यात आले असले तरी, या यानाने आता चांद्रभूमीवरील खडक आणि मातीमध्ये पाणी असल्याच्या खुणा शोधून काढल्या आहेत. या यानावरील एका साधनाद्वारे पृष्ठभागावरील माती आणि खडकांची स्पेक्ट्रल रिफ्लेक्टन्स तपासणी करून त्याच वेळी पाण्याचे अस्तित्व शोधून काढले. हे प्रथमच घडले आहे.

🔰काही विशिष्ट काळात चंद्राच्या बाह्य आवरणातील पाणीसाठे हे वाफेच्या स्वरूपात उडून गेल्याने चांद्रभूमी ही कोरडी होत गेली असावी, असे या अभ्यासातून पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment