2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो (ब्रिटन) येथे भारत आणि ब्रिटन या देशांच्या पंतप्रधानांनी “ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह - वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड” प्रकल्पाचे अनावरण केले, जी स्वच्छ ऊर्जेच्या जागतिक संक्रमणाला गती देण्यासाठी खंडांमध्ये वीज ग्रीड जोडण्याची योजना आहे.
🔰OSOWOG (वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड) उपक्रम हा जगभरातील देशांना वीजपुरवठा करणारी एकल ट्रान्सनेशनल इलेक्ट्रिसिटी ग्रिड यंत्रणा ठरत आहे.
या उपक्रमामुळे केवळ साठवण गरजा कमी होणार नाहीत तर सौर प्रकल्पांची व्यवहार्यता देखील वाढेल. या उपक्रमामुळे केवळ कार्बन फूटप्रिंट आणि ऊर्जा खर्च कमी होणार नाही तर विविध देश आणि प्रदेशांमधील सहकार्यासाठी एक नवीन मार्ग देखील उघडेल.
अश्या एकल ग्रीड यंत्रणेद्वारे, स्वच्छ ऊर्जा कुठेही आणि कधीही प्रसारित केली जाऊ शकते.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
No comments:
Post a Comment