(PREAMBLE)
- सरनामा म्हणजे, "राज्यघटनेची प्रारंभिक माहिती".
- संविधान ज्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे ते तत्वज्ञान सरनाम्यात समाविष्ट आहे.
- जगात सर्वप्रथम "अमेरिका" राष्ट्राच्या घटनेत सरनामा लिहिला गेला.
- भारताने आपल्या घटनेत सरनामा असावा ही बाब "अमेरिकेकडून" स्वीकारली.
- 1919 चा भारत सरकार कायदा (माँटफर्ड) याला सरनामा होता. मात्र 1935 च्या कायद्याला सरनामा नव्हता.
- पं जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव घटनासमिती समोरचा दिशादर्शक होता.
- हा ठराव घटनासमितीने 22 जानेवारी 1947 ला बिनविरोधपणे संमत केला.
- हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे सरनामा नाही. मात्र सरनामा हा या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे.
- 22 जानेवारी ला उद्दिष्टांचा ठराव जरी संमत झाला असेल. तरी मूळ सरनामा हा घटना संमत झाल्यावर संमत करण्यात आला.
- भारतीय सरनाम्याची सुरुवात "आम्ही भारताचे लोक" तर अमेरिकेच्या सरनाम्याची सुरुवात ही आम्ही अमेरिकेचे लोक अशी आहे.
:
1) उद्दिष्टांचा ठराव मांडला ?
- पं. नेहरू
2) उद्दिष्टांचा ठराव मांडला तो दिनांक ?
- 13 डिसेंबर 1946
3) उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला?
- 22 जानेवारी 1947
4) सरनामा असावा हा आदर्श कोणाचा किंवा सरनामा असलेली जगातील पहिले संविधान?
- अमेरिका
No comments:
Post a Comment