Friday, 21 January 2022

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे उपसेनाप्रमुख; केंद्र सरकारने दिली मान्यता.

🔰भारतीय सुरक्षा दल त्यांच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही.

🔰मात्र, या शोधात सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

🔰एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...