Saturday, 22 January 2022

उद्याच्या परीक्षेत काय काळजी घ्यायला पाहिजे ?


( Just for motivation only )


      उद्या तुमचा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा दिवस , मनावर खूप दडपण असेल , काहींना टेंशन आलं असेल , काहींचा अभ्यास खूप चांगला झाला असेल , अशी प्रत्येकाची आजच्या दिवसात वेगवेगळी मानसिकता असणार आहे ...

         सर्वप्रथम , आज संध्याकाळ 6 पर्यंत जेवढा अभ्यास झाला तेवढा झाला , जास्त अभ्यास करायच्या नादात पडू नका . तुम्हाला सर्वांना एव्हाना कळलंच असेल की कितीही अभ्यास करा तो कमीच पडतो . 

          या पुढे mind stable ठेवा . किती वाचायचं राहिलंय या पेक्षा आपला खूप छान अभ्यास झाला आहे , अशा positive mindset मध्ये रहा . 

         मी नेहमी एक उदाहरण देतो . सुरवातीला 3 ओव्हर मध्ये 3 विकेट्स गेल्यानंतर पण match जिंकता येते आणि पाहिल्या 10 over मध्ये 80 ची opening partnership करून देखील काही वेळी match हरतात .

          ह्या वरून एक निष्कर्ष निघतो की , जो शेवटपर्यंत हार मनात नाही तोच ही स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो .

          प्रत्येकाने स्वतःला सांगा की हो , मी पास होऊ शकतो . जर तुम्ही अभ्यास केला असेल , जर तुमची practice चांगली झाली असेल जर तुमचं mind stable असेल तर नक्कीच तूमचा result येऊ शकतो .

          इथून पुढे आपला अभ्यास कसा exam मध्ये उतरवायचा ? paper attempt करायची आपली काय strategy असली पाहिजे ? ह्या गोष्टींवर विचार करा . 

         फक्त खूप अभ्यास केला म्हणून परीक्षा पास करता येत नसते , परीक्षेत जाताना योग्य mindset आणि योग्य strategy असणं खूप महत्त्वाचं असतं .


     तुम्हाला अजून काही सांगायची गरज नाही , सगळ्यांनी आज पर्यंत कसाही अभ्यास केलेला असू द्या , उद्या जाऊन एकदम जोरदार batting करायची आहे , चांगल्या प्रकारे पेपर सोडवा , शांत रहा , घाई करू नका , सुरवातीला काही प्रश्न अडचणीचे आले तर ते नंतर सोडवा , तुमचा सगळ्यांचा उद्याचा दिवस चांगला नक्कीच जाणार .


Best Luck ✌️✌️


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...