Sunday, 9 January 2022

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद



🔰करोना, विशेषत: ओमायक्रॉन उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच स्वयंअर्थसहित, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. या काळात वर्ग आणि परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीने सुरू राहतील.


🔰महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केच राहील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. करोनाचा उद्रेक आणि विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षांबाबतही चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून जनतेश संवाद साधताना स्पष्ट केले. 


🔰करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळांपाठोपाठ महाविद्यालये बंद करण्याबाबत मंगळवारी कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केल्यावर सामंत यांनी निर्णय जाहीर केला.  विद्यार्थी हा केंद्रिबदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...