Wednesday, 12 January 2022

सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात - बिहार, गुजरातमधील स्थितीही चिंताजनक.

देशातील ३३ लाख मुले ही कुपोषित असून त्यातील निम्मी मुले अती कुपोषित गटात असून त्यांचे प्रमाण महाराष्ट्र, बिहार, गुजरात या राज्यांत अधिक आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्रालयाने  माहिती अधिकाराअंतर्गत उत्तरात दिली आहे.

🔰देशातील सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात असून ही  संख्या ६.१६ लाख आहे. त्यात मध्यम   कुपोषित मुले १.५७ लाख,  तर जास्त कुपोषित मुलांची संख्या ४.७५ लाख आहे.

दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून तेथे ४.७५ लाख कुपोषित मुले आहेत. त्यात  ३ लाख २३ हजार ७४१ मुले मध्यम कुपोषित तर १ लाख ५२ हजार ०८३ मुले जास्त कुपोषित आहेत.

🔰गुजरातमध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण ३.२० लाख असून त्यातील १.५५ लाख मध्यम कुपोषित तर १.६५ लाख जास्त कुपोषित आहेत.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...