Saturday, 1 January 2022

चालू घडामोडी प्रश्न सराव

📚कोणत्या व्यक्तीची 27 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नियुक्ती झाली?
(A) प्रदीप कुमार रावत
(B) विक्रम मिसरी✅
(C) दत्तात्रय पडसलगीकर
(D) पंकज सरन

📚खालीलपैकी कोणते हिमाचल प्रदेशातील हमीरपूर भागात 27 डिसेंबर 2021 रोजी उद्घाटन झालेल्या पहिल्या जलविद्युत प्रकल्पाचे नाव आहे?
(A) धौलसीध जलविद्युत प्रकल्प✅
(B) सावरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्प
(C) रेणुकाजी धरण प्रकल्प
(D) लुहरी टप्पा 1 जलविद्युत प्रकल्प

📚कोणत्या संस्थेने 28-29 डिसेंबर 2021 रोजी "NEP-2020 याच्या संदर्भात मनुष्यबळ विकासाचे परिवर्तन" विषयक एक राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला?
(A) राष्ट्रीय आर्थिक संशोधन विभाग 
(B) भारतीय गुणवत्ता परिषद
(C) भारतीय पुनर्वसन परिषद✅
(D) पीआरएस विधान संशोधन

📚कोणत्या राज्यात पंतप्रधान मोदी यांनी 27 डिसेंबर 2021 रोजी ‘लुहरी टप्पा 1 जलविद्युत प्रकल्प’चे उद्घाटन केले?
(A) उत्तर प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) पंजाब
(D) हिमाचल प्रदेश✅

📚कोणत्या संस्थेने 28 डिसेंबर 2021 पर्यंत ग्राम उजाला कार्यक्रमांतर्गत 50 लाख एलईडी दिवे वितरित करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला?
(A) सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
(B) कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड✅
(C) अदानी समूह
(D) रिन्यू पॉवर  

📚खालीलपैकी कोणते फ्लॅग हिल डोकाला (सिक्कीम) येथे समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर बांधण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी पुलाचे नाव आहे?
(A) ढोला सादिया पूल
(B) बोगीबील पूल
(C) दुपदरी मॉड्यूलर पूल✅
(D) वेंबनाड रेल्वे पूल

📚कोणत्या व्यक्तीला 27 डिसेंबर 2021 रोजी "अनकव्हरिंग इंडिया इनव्हिजिबल" श्रेणीमध्ये रामनाथ गोएंका पुरस्कार प्रदान करण्यात आला?
(A) शिव सहाय सिंग✅
(B) एन. रवी
(C) एल. व्ही. नवनीथ
(D) राजीव सी. लोचन

📚कोणता जिल्हा 28 डिसेंबर 2021 रोजी उदघाटन करण्यात आलेल्या बिना तेलशुद्धीकरण प्रकल्प (मध्य प्रदेश) आणि POL टर्मिनल (पनकी, कानपूर, उत्तर प्रदेश) या ठिकाणांना जोडणाऱ्या बहुउत्पाद पाइपलाइन प्रकल्पाच्या अंतर्गत समाविष्ट केला जाईल?
(A) ललितपूर
(B) जालौन
(C) झाशी
(D) वरील सर्व✅

📚कोणत्या भारतीय जहाजाने 26-27 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बेपोर आंतरराष्ट्रीय जल महोत्सवात सहभागी होण्यासाठी बेपोर बंदराला भेट दिली?
(A) INS शारदा✅
(B) INS सुवर्णा
(C) INS सावित्री
(D) INS सुजाता

📚कोणत्या देशाने 27 डिसेंबर 2021 रोजी “झियुआन-1 02E” नामक एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
(A) उत्तर कोरिया
(B) चीन✅
(C) दक्षिण कोरिया
(D) जपान

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...