Wednesday 19 January 2022

एअर मार्शल संदीप सिंग: भारतीय हवाई दलाचे उपमुख्य.

🔥भारतीय हवाई दलाने एअर मार्शल संदीप सिंग यांनी 01 ऑक्टोबर 2021 रोजी वाइस चीफ ऑफ एयर स्टाफ (VCAS) अर्थात भारतीय हवाई दलाचे उपमुख्य म्हणून पदभार स्वीकारला.

🔥एअर मार्शल संदीप सिंग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. ते अतिविशिष्ठ सेवा पदक आणि विशिष्ठ सेवा पदक प्राप्तकर्ता आहेत. 1983 साली ते भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेत लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झाले.

🦋भारतीय हवाई दल (IAF) विषयी..

🔥भारतीय हवाई दल ही भारतीय लष्कराची एक महत्त्वाची शाखा आहे. 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय हवाई दल दिन म्हणून पाळला जातो.

🔥पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंग निर्माण झाले, ते म्हणजे हवाई युद्ध. या युद्धाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन,रशिया व अमेरिका ह्या राष्ट्रांनी अनुक्रमे युद्धात करण्यास सुरुवात केली. 1918-38 या एकवीस वर्षांच्या (दोन जागतिक युद्धांच्या) संधिकाळात अनेक लहान-मोठ्या राष्ट्रांनी हवाई दले स्थापण्यास सुरुवात केली. 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी भारत देशात ‘रॉयल एअर फोर्स’ याची स्थापना केली.

🔥स्थानिक भारतीय वैमानिकांची पहिली प्रशिक्षित तुकडी 1933 साली बाहेर पडली. 16 मार्च 1939 रोजी सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय अधिकारी स्क्वॉड्रन कमांडर झाले. तेच पुढे भारतीय हवाई दलाचे पहिले भारतीय प्रमुख झाले.

No comments:

Post a Comment