Saturday, 29 January 2022

प्रजासत्ताक दिनी परिंचेत सरपंचानी रचला इतिहास

सरपंच ऋतुजा जाधव यांच्या कल्पनेतून स्वच्छता कर्मचाऱ्याचा सन्मान


२६ जानेवारी हा समस्त भारतीयांचा राष्ट्रीय सण. संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वजरोहण करून सलामी दिली जाते. गावपातळीवर ग्रापंचायतीत राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मान हा गावचे प्रथम नागरिक या नात्याने सरपंच यांचा असतो. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात मात्र भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी ध्वजरोहणाचा मान हा ग्रा.पं चे स्वच्छता कर्मचारी पार्वती पोळ यांना देण्यात आला. परिंचे गावच्या सरपंच ऋतुजा जाधव यांनी ध्वजारोहणाचा आपला मान पार्वती पोळ यांना देत एक आदर्शच घालून दिला आहे. ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांवर ध्वजारोहण समारंभाची पूर्वतयारीची जबाबदारी असते. अगदी ध्वजारोहणाचा स्तंभ, राष्ट्रीय ध्वज फडकविण्यासाठी दोरी बांधून ठेवणे, परिसर स्वछ करणे ही कामे ध्वजारोहणापूर्वी ग्रा.पं.चे शिपाई करतात. परिंचे ग्रा.पं. मध्ये गेली २५ वर्ष स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या पार्वती पोळ यांना हा ध्वजारोहांचा सन्मान देण्यात आला. यानिमित्ताने सरपंच ऋतुजा जाधव यांनी शिपाई पोळ यांना ध्वजारोहणाचा मान देऊन एक वेगळाच आदर्श घालून दिला. ज्या ग्रामपंचायतमध्ये २५ वर्ष इमानइतबारे सेवा केली. तिथे मिळालेल्या या बहुमानाने पार्वती पोळ यांना गहिवरून आले.

ध्वजारोहण करण्याचा सन्मान हा बहुमान कोरोनाच्या कालावधीसह दैनंदिन कामकाजात योगदान देणाऱ्या स्वच्छता दूताच्या मार्फत करण्याचा विचार आला. आपला देश हा शेतकऱ्यांचा व कष्टकरी कामगारांचा आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेचा सन्मान करण्यासाठी पार्वती पोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संविधानातील सामाजिक समता व बंधुता मी प्रत्यक्ष कृतीतून जपली आहे. : ऋतुजा जाधव सरपंच परिंचे

ध्वजारोहणाचा सन्मान माझ्यासारख्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हस्ते केल्याने गेल्या २५ वर्षाच्या प्रामाणिक सेवेचे फळ मिळाल्याची भावना आहे. एवढ्या मोठ्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ध्वजारोहण करणे हा माझा जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. : श्रीमती. पार्वती पोळ ग्रा पं. कर्मचारी परिंचे

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...