Thursday 20 January 2022

अर्थशास्त्र

अर्थशास्त्र हा विषय आवड घेऊन शिकला तर त्याच्या सारखा सोपा विषय नाही पण कंटाळा केला तर त्यासारखा अवघड विषय नाही..
आपण  mpsc च्या अनुषंगाने विचार करू ,हा विषय पूर्व परीक्षेला 15 मार्क साठी असतो

या 15 मार्काचा विचार करू..
जर तुम्ही नीट अभ्यास केला तर 15 पैकी कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 13-14 मार्क मिळू शकतात...

अर्थशास्त्र मध्ये फाफट पसारा असा काहीच नाही,selective topic केले की तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात..या टॉपिक मध्ये...

1】दारिद्र्य,बेरोजगारी आणि त्यांचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न यावर fix 1 -2 मार्कसाठी प्रश्न विचारले जातात.

2】व्यापारी बँका व RBI हे दोनच टॉपिक या मध्ये IMP आहेत हे 2 टॉपिक 2 मार्क मिळवून देतील .

3】भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारतोल आणि व्यवहारतोल आणि कर संरचना याला चालू घडामोडी ची सांगड घालून अभ्यास केला पाहिजे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात..यावरती 3-4 प्रश्न येतील

4】सार्वजनिक वित्त या पॉईंट वर सध्या जास्त प्रश्न विचारले जातात ,हा पॉइंट चांगला करा + CURRENT ची आकडेवारी सुद्धा नीट करा जेणेकरून येथे 3-4 मार्क मिळतील

पुस्तक वाचताना
1】प्रथम जो टोपीक घेणार त्याचे आयोगाने विचारलेले प्रश्न वाचा ,उत्तरे वाचा**

2】आता तो संपूर्ण टॉपिक वाचा,त्यानंतर आयोगाचे त्या टॉपिक वरील  प्रश्न पुन्हा वाचा.【आता कल्पना येईल की प्रश्न कसे विचारले आहेत】

3】दुसऱ्या वाचनाला स्वतःच्या नोट्स तयार करा, थोडी जागा रिकामी ठेवा कारण प्रत्येक टॉपिक जवळ एक तर current घडामोडी किंवा इतर माहिती update होणार असते..

4】या नोट्स जपून ठेवा ज्या तुम्हाला परीक्षेच्या कालावधीत 1 -2 दिवसात अर्थशास्त्र चा अभ्यास करण्यात मदत करतील.

■ परीक्षेला थोडा अवकाश  असल्याने आता पासून नोट्स काढायला हरकत नाही..

✅यशस्वी भव:

No comments:

Post a Comment