Sunday, 30 January 2022

यशाची पहिली पायरी म्हणजे कृती करणे...


👉 मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि लोक अपयशी का होतात... आणि यशाची पहिली पायरी कोणती आहे... हे सर्व आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत आणि  शिकणार आहोत... 👍

👉 मित्रांनो, आजच्या धावपळीच्या काळात सर्वांना यशस्वी व्हायचं आहे... प्रत्यक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्न नुसार मोठ मोठ्या योजना तयार करतो, तरी सुद्धा खुप कमी लोक यशस्वी होतात...

👉 प्रत्येकजण स्वप्न पाहतो,  Goal ठरवतो, Plan तयार करतो तरी सुद्धा 98% लोक अपयशी होतात... आणि फक्त 2% लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि यशस्वी होतात... यामागे फक्त आणि फक्त एक कारण आहे ते म्हणजे Action न घेणे...

यशाची सर्वात महत्वाची पहिली पायरी ती म्हणजे Action घेणे...

खुप लोक दिवसभर विचार करतात, दिवसभर योजना तयार करतात परंतु Action करत नाही... त्यामुळे त्यांना अपयश येते...

👉 मित्रांनो, तुम्ही ठरवलेल्या योजना नुसार Action केलीच नाही तर तुम्हाला Result हा हमेशा शून्यच  मिळेल...

आजकल लोक Action का घेत नाही त्यामागे कोणकोणते कारणे आहेत ते पाहुयात...

Action न घेण्याचे कारणे किंवा अपयशी होण्याचे कारणे...

1) आत्मविश्वासाची कमी असणे...
2) कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी चांगल्या वेळेची वाट पाहणे...
3) आजचे काम उद्यावर ढकलणे
4) आळस

मित्रांनो, जसे कि मी सांगितल तुम्ही जो पर्यंत Action करणार नाही तो पर्यंत तुम्हाला Result मिळणार नाही... त्यामुळे तुम्ही आज पर्यंत फक्त स्वप्न पाहत असाल किंवा फक्त plan करत असाल किंवा चांगल्या वेळेची वाट पाहत असाल तर त्या साऱ्या गोष्टी आजपासून सोडुन द्या... आणि डायरेक्ट Action करा...

उदाहरणं :-  पुस्तक वाचल्याने ज्ञान मिळते... आता ही गोष्ट सर्वांना माहित आहे... परंतु तुम्ही जो पर्यंत पुस्तक वाचणार नाही तो पर्यंत तुमचे ज्ञान वाढणार नाही... 👍

ज्ञान वाढवण्यासाठी तुम्हाला रोज पुस्तके वाचावे लागतील तेंव्हाच तुमचे ज्ञान वाढेल... फक्त विचार करून तुमचे ज्ञान वाढणार नाही हे लक्षात ठेवा...

मित्रांनो, Action घेण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देत आहे... त्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...

1) सर्वात प्रथम Goal ठरवा...
👉 ( Goal कसे ठरवावे याबद्दल मी अगोदर एक लेख लिहिलेला आहे तो लेख नक्की वाचा...)

तुम्हाला तुमचे जीवन कसे जगायचे याची कल्पना करा...  त्यानंतर तुम्हाला कोणती नोकरी करायची किंवा कोणता बिजनेस करायचा आहे हे ठरवा...

मित्रांनो, आपले Goal आपल्याला माहिती पाहिजे जेंव्हा आपल्याला आपले goal माहिती असते तेंव्हाच आपण पूर्ण स्पीड ने त्या Goal कडे जाऊ शकतो... आणि Goal पूर्ण करू शकतो...

सर्वात प्रथम तुमचे Goal काय आहे हे ठरवा... 👍

2) Micro Plan बनवा...
👉 मित्रांनो, तुम्ही जे कोणते  Goal ठरवले असतील  ते Goal कसे पूर्ण होतील हा प्रश्न स्वतःला विचारा आणि थोडा वेळ विचार करा...

एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...

👉 समजा, माझं स्वप्न आहे पोलीस बनायचं...

मी माझे Goal ठरवलं मला पोलीस बनायचं आहे...

नंतर मी स्वतःला एक प्रश्न करेल कि... मला पोलीस बनण्यासाठी काय काय करावे लागेल...?

हा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारेल तेंव्हा मला खुप उत्तरे मिळतील... जसे कि

रोज सकाळी लवकर उठावे लागेल

रोज सकाळी रनिंग करावी लागेल व्यायाम करावा लागेल...

रोज 4 घंटे अभ्यास करावा लागेल...

हे पहा.. मला पोलीस बनण्यासाठी वरील सर्व गोष्टी कराव्या लागतील तेंव्हाच मी पोलीस होऊ शकतो...

परंतु

👉 मी जर अभ्यास केलाच नाही किंवा सकाळी रनिंगला गेलोच नाही तर काय होईल... याचा परिणाम असा होईल कि मी पोलीस अजिबात होऊ शकणार नाही..

मित्रांनो, तुमचे जे कोणते स्वप्न असतील त्याचा plan नक्की बनवा परंतु Micro Plan वर जास्त फोकस करा

Micro Plan म्हणजे प्रत्येक लहान गोष्टीचा plan बनवणे

समजा तुम्हाला टरबूज खायाचे आहे तर कसे खासाल...

तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे

आपण त्या टरबूजचे छोटे छोटे भाग करू आणि नंतर एक भाग खाऊ

मित्रांनो यालाच Micro plan म्हणतात... तुमचा जो कोणता Plan आहे त्याला खुप लहान भागामध्ये विभागून घ्या... जेंव्हा तुम्ही Micro Plan बनवता तेंव्हा प्रत्येक दिवसी काय करायचे आहे हे तुम्हाला समजेल आणि त्यानुसार तुम्ही Action घेशाल

समजा

एक पुस्तक एक महिन्यात वाचायचे असेल तर सर्वात प्रथम विचार करा...त्या पुस्तकात ऐकून पेज किती आहेत

समजा त्या पुस्तकात ऐकून पेज 450 आहेत

तेंव्हा त्या पेजला विभागून घ्या 30 दिवसामध्ये..

450 ÷ 30 = 15 पेज

म्हणजे तुम्हाला एक पुस्तक एका महिन्यात संपवायचे असेल तर रोज पेज वाचावे लागतील तेंव्हाच 30 दिवसात एक पुस्तक वाचुन संपवाल
🏃 PRACTICE MAKES MAN PERFECT✒👍🏻

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...