Tuesday, 25 January 2022

राष्ट्रध्वजाच्या अभिवादनार्थ ७३ किलोमीटरची दौड.

🔰देशाचा ७३ व्या प्रजासत्ताक दिन बुधवारी असून उपायुक्त हरि बालाजी यांनी ७३ किलोमीटर अंतर धावून अनोख्या पद्धतीने राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. गेल्यावर्षी अमरावतीमध्ये  त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर अंतर कापले होते.

🔰वांद्रे कुर्ला संकुलापासून ही मोहीम सुरू झाली. यावेळी परिमंडळ १ चे उपायुक्त बालाजी यांच्यासोबत ९ आणखी धावपटू सहभागी झाले होते. तेथून ते मुलुंडला गेले. तेथून पुन्हा वांद्रे कुर्ला संकुल परिसरात परतले. तेथून नरिमन पॉईंटपर्यत ते व त्यांच्या सोबतचे धावपटू धावले. तेथून ते पुन्हा गेट वे ऑफ इंडियाला आले. त्यातील बालाजी यांच्यासह एकूण तीन धावपटूंनी संपूर्ण ७३ किलोमीटरचे अंतर पार पाडले. उर्वरीत सहा जणांनी ५५ किलोमीटर अंतर कापले. शेवटच्या २१ किलोमीटर अंतरात ७० धावपटू सहभागी झाले होते.

🔰त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे देशाचा तिरंगा झेडा फडकावून अभिवादन करण्यात आले. बालाजी यांनी मध्यरात्री १२ वाजता धावायला सुरूवात केली होती.ते सकाळी साडे आठच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले. बालाजी यांनी गेल्यावर्षीही अमरावतीमध्ये कार्यरत असताना ७२ किलोमीटरचे अंतर धावून पार पाडले होते.

No comments:

Post a Comment