Thursday, 20 January 2022

राज्यसेवा पूर्व साठी चालु घडामोडी चा अभ्यास करताना खालील गोष्टी नक्की ध्यानात असू द्या..

👉 Year book वाचायची सुरुवात डायरेक्ट पुरस्कार पासून करा ( 1 ते 2  मार्क्स कव्हर होतील) ( जास्त फोफट पसारा न वाचता selected पुरस्कार करा ).
मराठी भाषे संदर्भातील पुरस्कार चांगले करा ( Ex. मागच्या वेळेच्या नाळ चित्रपट वरील प्रश्न )

👉 दुसऱ्या नंबर ला तुम्ही पर्यावरणीय घडामोडी (Selected) ठेऊ शकता ( यात प्रत्येक गोष्ट वाचणे expected नाहीये ज्या गोष्टी जास्त चर्चेत होत्या फक्त त्याच करा ex. मागच्या वर्षी अमेझॉन जंगलात लागलेली आग) .

👉 तिसऱ्या क्रमांकावर राजकीय घडामोडी घ्या ( इथे सुद्धा खूप specific वाचा जास्त डीप प्रश्न विचारत नाही महत्त्वाचं तेवढं विचारलं जात ) ( ex. राज्यांच्या निवडणुकांचे रिपोर्ट सहसा paper मध्ये विचारले जात नाही, किंवा काही विधेयके/कायदे विचारले जात नाहीत) यामध्ये जे सर्वाधिक चर्चेत होते तेच वाचा.

👉 चौथ्या क्रमांकावर तुम्ही अंतरराष्ट्रीय घडामोडी ठेवू शकता ( हे वाचताना भारताचा ज्या ज्या ठिकाणी संबंध आहे ते चांगल करा Ex. मागच्या वेळी चाबहर बंदर विचारले)

👉 5 व्य क्रमांकावर आर्थिक घडामोडी ( यात HDI, GHI हे दोनच इंडेक्स महत्त्वाचे आहेत तेवढे जास्त चांगले करा बाकी आवश्यकता नाही )
महत्त्वाच्या परिषदा ( ब्रिक्स/ SCO / UNFCCC )

👉 6 व्या क्रमांकावर काही लेखकांचे पुस्तके / संमेलने यासंदर्भात माहिती घ्या ( मराठी साहित्य संमेलन )

👉 काही महाराष्ट्र संदर्भात असलेल्या घडामोडी चांगल्या करा ( ex. मागच्या वेळी आरे वसाहत विचारले )

या क्रमाने का करायचे..... ?
CURRENT वाचत असताना ते जर पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेटपर्यंत वाचत जातो म्हटल्यास ते जास्त रटाळवाने वाटते.
आणि यामध्ये ज्या महत्त्वाचा गोष्टी असतात त्या जास्त Highlite होत नाहीत.
म्हणून आधी महत्त्वाचे नंतर बाकीचे...

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...