Wednesday, 19 January 2022

दिवस नि रात्र समान असणारा दिवस

दरवर्षी २१ मार्च आणि २३ सप्टेंबर हा विषुवदिन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. आज ही स्थिती तयार होऊन समान दिवस-रात्र अनुभवता येणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोलार्धात मात्र समान दिवस-रात्र वेगवेगळे राहणार आहेत.

पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाच्या संदर्भात सुमारे २३.५ अंशाने वळलेला आहे. त्यामुळे तिचा उत्तर वा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कमी-अधिक झुकलेला राहतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस-रात्री लहान वा मोठ्या होतात. ऋतु उद्भवतात. तसेच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन घडते.

वर्षांतून दोनदा २२ डिसेंबर व २१ जून महिन्यात, अशी स्थिती येते. दिवस-रात्र समान ही अवस्था त्या ठिकाणाच्या स्थानावर, विशेषत: अक्षवृत्तावर अवलंबून असते. अक्षवृत्तीय स्थानानुसार हा फरक कमी-अधिक काही आठवड्यांचाही असू शकतो. अंशावर २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान असते. सर्वसामान्यांना २३ सप्टेंबर, २१ मार्चला आपल्याकडे सुद्धा दिवस-रात्र समान असते, असेच वाटत असते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...