Sunday, 9 January 2022

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याच्या नोंदी जतनाचे आदेश; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात याचिका



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ जानेवारीच्या पंजाब दौऱ्याशी संबंधित सर्व नोंदी त्वरित सुरक्षित जतन करून ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांना शुक्रवारी दिले.


🔰पजाब सरकार, पंजाब पोलीस, एसपीजी आणि अन्य केंद्रीय तसेच राज्यस्तरीय संस्थांनी संबंधित नोंदी जतन करण्यासाठी महानिबंधकांना सहकार्य करून आवश्यक ती मदत करावी, असे निर्देश सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले.


🔰या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीला होणार असून तोपर्यंत पंतप्रधानांच्या भेटीशी संबंधित सुरक्षा उपायांमध्ये राहिलेल्या त्रुटींबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समित्यांचे काम थांबवण्यात यावे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पंजाब सरकारला दिले. मोदी यांच्या पंजाब.


🔰दौऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळलेल्या कथित सुरक्षा त्रुटींबाबत सखोल चौकशीच्या मागणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुरक्षा त्रुटीच्या या प्रकरणात केंद्राने ‘‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’’ असण्याची शंका व्यक्त करून तपासात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सहभागी

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...