🚶♂ उददे्श = राष्ट्र संरक्षणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख अथवा अन्य स्वरुपात प्राप्ति झालेल्या स्वेच्छा देणग्यांची जबाबदारी व त्यांचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय संरक्षण निधीची स्थापना करण्यात आली.
🚶♂निधीचा वापर = सशस्त्र सेनादलातील सैनिक (निमलष्करी दलातील सैन्य अंतर्भूत) व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता हा निधी वापरला जातो.
🚶♂व्यवस्थापन = पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमार्फत या निधीचे व्यवस्थापन केले जाते. या समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसेच वित्तमंत्री आदी सदस्य असतात. वित्तमंत्री या निधीचे खजिनदार असून पंतप्रधान कार्यालयातील संयुक्त सचिव या समितीचे सचिव म्हणून काम बघतात.
🚶♂साठा = रिझर्व बँकेतील खात्यात हा निधी जमा करण्यात येतो. हा निधी पूर्णपणे लोकांनी दिलेल्या देणग्यांवर अवलंबून असतो. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची तरतूद नसते. या निधीसाठी आपले योगदान देण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करता येतात.
No comments:
Post a Comment