Sunday, 9 January 2022

फ्रान्समध्ये आढळला करोनाचा नवीन प्रकार; तब्बल ४६ म्युटेशन झाल्याची तज्ज्ञांची माहिती.



🔰जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असून अनेक नवनवीन व्हेरिएंट समोर येऊ लागले आहेत. ओमायक्रॉननंतर डेल्मिक्रॉन आणि फ्लोरोना या व्हेरिएंटचे रुग्ण देखील आढळत आहेत. त्यातच आता आणखी एक व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. फ्रान्समध्ये करोनाचा एक नवीन व्हेरिएंट आढळला असून तो तब्बल ४६ वेळा उत्परीवर्तीत (म्युटेट) झाला आहे. या नवीन व्हेरिएंटला संशोधकांना ‘आयएचयू’ असं नाव दिलंय.


🔰फरान्सच्या मारसैल मध्ये करोनाचा ‘आयएचयू’ हा नवा प्रकार सापडला असून त्याचे १२ रुग्ण आढळले आहेत. लागण झालेले सर्वजण हे आफ्रिकी देश कॅमेरूनहून परतले होते, अशी माहिती डेली मेलने दिलीय. फ्रान्समध्ये सध्या करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यातच हा नवा प्रकार सापडल्यानने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. करोनाच्या आयएचयू या प्रकाराचा पहिला रुग्ण १० डिसेंबरला आढळला होता.


🔰आयएचयू व्हेरिएंट अन्य देशांमध्ये पसरला आहे की नाही, याचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना व्हेरिएंट अंडर इन्व्हेस्टिगेशनचा टॅग लावून तपास करणार आहे. आयएचयूचा शोध लावणार्‍या टीमचे प्रमुख प्राध्यापक फिलिप कोलसन यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट जास्त घातक असून शकतो आणि याच्यावर लसीचा परिमाण होण्याची शक्यता कमी आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...