Thursday, 20 January 2022

23 तारखेच्या राज्यसेवा पुर्व मध्ये Attempt किती असावा🤔?

सध्याचा सर्वात  Hot Topic म्हणजे Attempt किती असावा? यावर माझं वयक्तिक मत मी सांगत आहे. यामध्ये मतमतांतर असू शकतात पण काही बाबी सांगाव्या वाटतात त्या खालीलप्रमाणे :

1. Attempt  हा व्यक्तीपरत्वे वेगळा असू शकतो. शेवटी तुमच्या attempt ची link तुमच्या अभ्यासापर्यंत जाते.
                     
2. एखादा 100 Attempt करून gs ला 120+ marks घेऊ शकतो तर दुसरा 75-80  Attempt करून सुद्धा 120+ Marks घेऊ शकतो. सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्या Accuracy चा आहे. ती जर मध्यम स्वरूपाची असेल तर तुम्ही जास्त attempt करायला पाहिजे. Accuracy जर खूपच चांगली असेल तर कमी Attempt मध्ये सुद्धा तुम्ही चांगले Marks मिळवू शकता. आता एवढे Paper Solve केल्यावर तुम्हाला तुमचा अंदाज आलाच असेल. मी पहिल्या Category मध्ये येतो.
  
3. आणखी एक मुद्दा म्हणजे Paper च्या Difficulty Level चा. जर paper जास्त Tough वाटत असेल तर Attempt थोडा कमी झाला तरी चालेल. पण थोडा Easy - Moderate Paper ला मात्र Attempt खूप कमी असून चालणार नाही.Paper Easy का Tough हे प्रश्न समोर आल्यानंतर लगेच लक्षात येऊन जाते. त्यानुसार आपल्याला आपला Attempt  कमी - जास्त हे ठरवता यायला पाहिजे. एक Optimum Risk घेतली तर फायदाच होईल. कारण 50-50 वर आलेले Questions Skip करून / काही Logic लागत असूनही भीतीपोटी प्रश्न सोडून देऊन हाती काही लागत नाही.

4. जे लोक वरती सांगितलेल्या पहिल्या Category मध्ये येतात त्यांनी gs मध्ये Min 85-90 Attempt करायला हवा. आणि CSAT मध्ये 65-70..कारण Accuracy खूपच चांगली नसल्यामुळे Attempt थोडा High ठेवावा लागणार आहे. बाकी आणखी कितीपर्यंत न्यायचा हे तुम्ही वयक्तिक ठरवू शकता. 

5.शेवटी Attempt ही गोष्ट एका Limit नंतर जास्त मॅटर करत नाही. तुमचा अभ्यास, Revision, Exam Hall मधील तुमची Psychology, Temperament etc. या गोष्टीच जास्त परिणाम करतात.

6. So Attempt चा निर्णय तुम्ही वरील Criteria's लावून घेऊ शकता.आणि आपल्यासाठी काय Best आहे हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोणीही ओळखू शकत नाही. So choose Your Best👍👍.

सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...