Monday, 20 December 2021

१०वी आणि १२वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा


🔰गेल्या दोन वर्षांपासून जगभरात करोनाचं संकट थैमान घालत आहे. या संकट काळात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान देखील झालं. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अनेक वर्ग ऑनलाईन झाले.


🔰महाराष्ट्रात आत्ता कुठे शाळा काही प्रमाणात सुरू होत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर किमान पुढील वर्षी तरी १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार का? आणि होणार तर कधी आणि कशा होणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता या परीक्षांचा मुहूर्त ठरला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.


🔰वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी अर्थात २०२२ साली १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे.


🔰लखी परीक्षा किती काळ चालणार - “ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण १०वी आणि १२वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


🔰परात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा कधी - “१२वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च तर १०वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होईल”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा ‘न्गदग पेल जी खोर्लो’ (ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्याल्पो) हा सर्वोच्च नागरी सन्मान  जाहीर झाला आहे. याबद्दल मोदी यांनी भूतानच्या राजांचे आभार मानले आहेत.


🔰दोन्ही देशांचे संबंध दृढ राहतील तसेच भारत भूतानला शक्य ती सर्व प्रकारची मदत करेल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.


🔰भतानचे पंतप्रधान लोटे शेरींग यांनी समाजमाध्यमांवर याबाबत माहिती दिली. भूतानच्या विकासाचे प्रारूप हे शाश्वत असल्याचे  कौतुक मोदींनी केले आहे. २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड केली होती.

मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयक निर्देशांक..


🔰‘इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस’ या संस्थेने मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयक निर्देशांक तयार केला आहे.


🔰हा निर्देशांक वयवर्षे 10 याखालील वयोगटातील मुलांमधील साक्षरतेचे सूचक आहे. हा निर्देशांक राज्यांना चार श्रेणींमध्ये विभागला गेला आहे, ते म्हणजे - मोठी राज्ये, छोटी राज्ये, ईशान्यकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश.


🔴ठळक नोंदी...


🔰निर्देशांकाच्या क्रमवारीत, पश्चिम बंगाल हे राज्य शालेय विद्यार्थ्यांमधील मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयक ज्ञानाच्या बाबतीत अव्वल ठरले आहे.राज्यांनी शासन स्तंभामध्ये वाईट कामगिरी केली आहे कारण अर्ध्याहून अधिक राज्यांची राष्ट्रीय सरासरी 28.05 होती, जी सर्व स्तंभांपेक्षा सर्वात कमी आहे.


🔰शिक्षणाच्या प्रवेशाच्या मुद्द्यासाठी सरकारांनी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. राजस्थान (25.67), गुजरात (22.28), आणि बिहार (18.23) यांसारख्या प्रमुख राज्यांची कामगिरी लक्षणीयरीत्या कमी आहे, जरी ईशान्य प्रांतांमध्ये त्यांच्या उच्च कामगिरीमुळे सर्वाधिक परिणाम आहेत.

भारतात अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा यांच्या निर्मिती परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या कार्यक्रमाला मंजुरी


🔰भारताला इलेक्ट्रॉनिक यंत्रणा संरेखन आणि निर्मिती क्षेत्रात एक जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 डिसेंबर 2021 रोजी देशात शाश्वत अर्धवाहक चकत्या (सेमीकंडक्टर चिप) आणि दृश्यपडदा (डीस्प्ले) यांच्या निर्मिती परीसंस्थेच्या विकासासाठी समावेशक कार्यक्रमाला मंजुरी दिली.


🔰अर्धवाहक चकत्या आणि दृश्यपडदा यांचे उत्पादन आणि संरेखन या क्षेत्रातील कंपन्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरेल असे अनुदान पॅकेज देऊन, इलेक्ट्रॉनिक निर्मिती क्षेत्रात नवे युग सुरु करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु केला जाईल.


🔴ठळक बाबी...


🔰कार्यक्रमामुळे धोरणात्मक महत्त्व आणि आर्थिक स्वावलंबित्व या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रांमध्ये भारताला तंत्रज्ञानविषयक आघाडी घेण्याचा मार्ग सुकर होईल.


🔰सिलिकॉन अर्धवाहक फॅब्स, दृश्यपडदा फॅब्स, संयुक्त अर्धवाहक चकत्या/ सिलिकॉन फोटॉनिक्स/ संवेदक (MEMS सह) फॅब्स, अर्धवाहक पॅकेजिंग (ATMP/OSAT), अर्धवाहक संरेखन यामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्या/ उद्योग संघ यांना आकर्षक मदत निधीचे पाठबळ पुरविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात आपण अनेक वेळा पाहतो की प्रत्येकाच्या टेबलावर headphones असतात.


जे सदस्य त्याचा वापर करत नाहीत….त्यांच्या सुद्धा टेबलावर ते तुम्हाला दिसतील… तर याच्या मागच नेमकं कारण काय आहे ?


हे headphones सभागृहात गोंधळ असतो म्हणून नसतात. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून अनेक सदस्य आलेले असतात. प्रत्येकाची भाषा वेगळी असते काहींची हिंदी, इंग्रजी भाषेवरती चांगलं प्रभुत्व असत.


तर काहींना आपापल्या राज्यातील बोली भाषाच व्यवस्थित समजतात जस की….कन्नड, तमिळ, मराठी, तेलगू इ. 


हे जे headphones आपण पाहतो हे काही साधेसुधे headphones नसतात या headphones च्या माध्यमातून भाषेच अनेक भाषेत भाषांतर होत असत.


जो सदस्य जी भाषा त्यावर सेट करेल त्या भाषेत त्याला समोरच्या सदस्याचे प्रश्न, उत्तर, किंवा भाषण ऐकू येत असतात.


ही सुविधा 7 सप्टेंबर 1964 मध्ये भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केली त्यावेळी फक्त हिंदीच इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीच हिंदीमध्ये भाषांतर होत असे नंतर काही वर्षांनी यात मराठी, कन्नड, तमिळ, तेलगू, पंजाबी, नेपाळी अशा अनेक भाषांचा समावेश करण्यात आला.


हे सगळं सांगण्याच निम्मित इतकंच आहे की जेव्हा एका खासदाराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इंग्रजीत प्रश्न विचारला तेव्हा नारायण राणे यांनी ते विशेष सुविधा असणारे headphones घातलेले होते याचा अर्थ त्याना तो प्रश्न मराठीत ही ऐकु आला असेल. 


राज्यसेवा पुर्व Paper 1 आणि Paper 2 च्या वेळी Exam Hall Management आणि मानसिकता कशी असावी??

🟣 यणारी राज्यसेवा पुर्व ही अनेकार्थाने वेगळी असणार आहे. आयोगाने प्रश्न विचारण्याची बदललेली पद्धती,कधी नव्हे ते Class 1 चे सर्व पद समाविष्ट असलेली जाहिरात, नवीन विद्यार्थ्यांनादेखील सम पातळीत मिळत असलेली संधी या सर्व प्रश्वभूमीवर ही 2 जानेवारीची परीक्षा होत आहे.

आपण परीक्षेसाठी अभ्यास तर करणारच आहोत. त्याबद्दल काहीच शंका नाही. पण कितीही अभ्यास झाला तरी परीक्षा Hall मधील दडपण सहन करण्याची ताकद आपल्यात जोपर्यत येत नाही तोपर्यत Exam Clear होणं थोडं अवघड आहे. त्यामुळेच म्हणतात MPSC ही अभ्यासाइतकीच तुमच्या Temperament ची देखील परीक्षा आहे. Exam Hall मध्ये नक्की कशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी Manage करता येतील याविषयीं आपण सविस्तर बोलू.

                        

❇️ 1. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाचं दडपण परीक्षा Hall मध्ये Manage व्हायला हवं. नाहीतर माझा अभ्यास झाला नाही, माझ्या एवढ्या Facts लक्षात राहतील का ,माझा अमुक विषयाचा अभ्यास पुर्ण झाला नाही, मला इतिहास जमतच नाही यासारखे प्रश्न मनात गोंधळ घालायला सुरुवात करतात. पण एक लक्षात घ्या अभ्यासाची वेळ आता निघून गेली आहे. आता जे आहे ते आपल आणि जे नाही तेदेखील आपलंच असं म्हणण्याची वेळ असते.मग आपण इतक्या दिवस काय करत होतो हा प्रश्नादेखील शिल्लक राहतोच असो.जेवढी शिदोरी आपल्या हातात आहे त्यावरच आपल्याला आता परीक्षा द्यायची आहे So no Excuse.


❇️ 2. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी जेवढं वाचलंय ते सगळं माझ्या लक्षात राहायला हवं. हा, एक Limit पर्यत Facts लक्षात ठेवाव्याच लागतात त्याबद्दल दुमत नाही. पण एक लक्षात घ्या आपली परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची आहे. Answers आपल्या समोर आहेत. त्यामुळे सर्व काही लक्षातच असलं पाहिजे असं काही नाही. प्रश्न आणि त्याचे पर्याय दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. So dont worry आता Study आठवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. Option समोर आल्यावर सर्व गोष्टी बरोबर आठवतात. पण त्यासाठी तुमची अभ्यासाची Revision मात्र खूप Strong हवी.


❇️ 3. आपल्या डोक्यातील Prejudices ( पूर्वग्रदूषिते )-


उदा.2020 चा Csat चा Paper Logical आणि थोडा Tough होता आता पण तसाच Paper येणार. आणि मी त्याच पद्धतीने सोडवणार. मित्रांनो हे जर इतकं सोपं असत तर आपण सगळेच परीक्षा पास झालो असतो. आयोगाने Paper कसा Set करावा हे आपण सांगू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की की ज्याप्रमाणे आयोगाने Paper Set केलाय त्यानुसार आपल्याला Exam Hall मध्ये बदलावं लागेल.


❇️ 4. 390 Magic Figure - यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जास्त जागा असल्यावर येणारे Unnecessary दडपण. एवढ्या जागा आहेत, त्यामध्ये पण Class 1 च्या सर्वात जास्त जागा इ. प्रकारचे प्रश्न मनात घोळायला लागतात. ज्यांचे 2-3 attempt झाले आहेत किंवा ज्यांचा पहिला Serious attempt आहे या लोकांच्या बाबतीत असं होऊ शकत. त्यामुळे जागांच burden न घेता आपल्या Natural form वरती Concentrate करा. Outout नक्की भेटेल.  


❇️ 5. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ही परीक्षा तुमच्या अभ्यासासोबतच तुमच्या मानसिकतेची आहे, तुमच्या Confidence ची आहे. आपण शांत राहून प्रत्येक प्रश्नाला कस समोर जातो याची आहे. अभ्यासाला तर पर्याय नाहीच. पण त्यासोबतच वरती सांगितलेल्या गोष्टी अभ्यासातक्याचं किंबहुना अभ्यासापेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी आपण या बाबींचा विचार करू आणि सर्वजण छान तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ.                     


2 जानेवारीसाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा 💐💐.


महाराष्ट्रातील पर्वत शिखरे



🔹शिखराचे नाव - उंची(मीटर)  -जिल्हे🔹


🔸कळसूबाई -  1646 - नगर


🔹साल्हेर - 1567  - नाशिक


🔸महाबळेश्वर - 1438 - सातारा


🔹हरिश्चंद्रगड  - 1424 -  नगर


🔸सप्तशृंगी - 1416 - नाशिक


🔹तोरणा - 1404  - पुणे


🔸राजगड -  1376 -  पुणे


🔹रायेश्वर - 1337-  पुणे


🔸शिंगी - 1293 - रायगड


🔹नाणेघाट -  1264  -  पुणे


🔸तर्यंबकेश्वर -  1304 - नाशिक


🔹बराट - 1177 - अमरावती


🔸चिखलदरा - 1115  - अमरावती

२०२१ महत्त्वपूर्ण स्पर्धा व विजेते


🔝 ३२वे ऑलिंपिक : अमेरिका (अव्वल) 


🏟️ ३२वे ऑलिंपिक : भारत ०७ पदके


🔝 १६वे पॅराऑलिम्पिक : चीन (अव्वल)


♿️ १६वे पॅराऑलिम्पिक : भारत १९ पदके


🏸 १७वा सुदीरमन कप : चीन


🏸 ३१वा थॉमस कप : इंडोनेशिया 


🏸 २८वा उबेर कप : चीन


🏀 २९वी फिबा आशिया कप : जपान


⚽️ ७वी इंडियन सुपर लीग : मुंबई सीटी


♟️ ९वा बुद्धिबळ विश्वचषक : जॅन क्रिझिस्टोफ 


♟️ १ला म. बुद्धिबळ विश्वचषक : अलेक्झांड्रा सी


⭐️ ०७वा टी-२० विश्वचषक : ऑस्ट्रेलिया 

महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या (२)



🕉️ जयोतिर्लिंग : ०५

👮‍♂️ कटक मंडळे : ०७

🏢 नगरपंचायत : १२६

🏢 जिल्हा परिषद : ३४

👩 महिला आमदार : २४

🏙️ यनेस्को क्रिएटिव्ह शहर : ०१


⚪️ नगरपालिका 'अ' दर्जा : १७ 

⚫️ नगरपालिका 'ब' दर्जा : ७३ 

🔴 नगरपालिका 'क' दर्जा : १४३

🔰 एकुण नगरपालिका : २३३ 


⚪️ महानगरपालिका 'अ' दर्जा : ०४

⚫️ महानगरपालिका 'ब' दर्जा : ०४

🔴 महानगरपालिका 'क' दर्जा : ०४

🔵 महानगरपालिका 'ड' दर्जा : १५

🔰 एकुण महानगरपालिका : २७

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण पदावरील व्यक्ती



👤 उद्धव ठाकरे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

👤 बी एस कोश्यारी : महाराष्ट्राचे राज्यपाल

👤 दिलीप वळसे-पाटील : गृहमंत्री 

👤 अजित पवार : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री

👩‍🦰 रपाली चाकणकर : महिला आयोग अध्यक्षा

👤 य पी एस मदान : निवडणूक आयुक्त

👤 सजय पांडे : महाराष्ट्र पोलिस महासंचालक

👤 सिताराम कुंटे : महाराष्ट्राचे मुख्य सचिव

👤 रामराजे निंबाळकर : विधानपरिषद सभापती

👩‍🦰 निलम गोऱ्हे : विधानपरिषदेच्या उपसभापती

👤 नरहरी झिरवळ : विधानसभेचे उपाध्यक्ष

👤 दवेंद्र फडणवीस : विधानसभा विरोधी पक्षनेते

👤 परविण दरेकर : विधानपरिषद विरोधी पक्षनेते

👤 आशुतोष कुंभकोणी : महाराष्ट्राचे महाधिवक्ता

👤 दिपंकर दत्ता : मुंबई उ.न्या. मुख्य न्यायाधीश

👤 वही एम कानडे : महाराष्ट्राचे लोकायुक्त

⭐️ दवानंद शिंदे : एमपीएससी अध्यक्ष

नोबेल पुरस्कार



🔸कषेत्र : ६

१)भौतिकशास्त्र

२) रसायनशास्त्र

३) शरीरविज्ञान किंवा औषध

४) साहित्य

५)शांती

६)अर्थशास्त्र (1969 पासून)


🔹दश :

-स्वीडन (शांतता पुरस्कार वगळता सर्व पुरस्कार)

-नॉर्वे (केवळ शांतता पुरस्कार)


🔸सादरकर्ते :

-स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र)

-कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये नोबेल असेंब्ली (शरीरविज्ञान किंवा औषध)

-स्वीडिश अकादमी (साहित्य)

-नॉर्वेजियन नोबेल समिती (शांतता)

-सेंट्रल बैंक ऑफ स्विडन(अर्थशास्त्र)


🔸बक्षीस : सुवर्णपदक, डिप्लोमा आणि अंदाजे 10 दशलक्ष,   US $ 1,145,000 (2020)


🔹पहिले पारितोषिक : 1901  (120 वर्षांपूर्वी)


🔸विजेत्यांची संख्या : 962


🔹परस्कार विजेते : 603 पुरस्कार (2020 पर्यंत)


🔸आल्फ्रेड नोबेल या स्वीडीश शास्त्रज्ञाने 1867 मध्ये 'डायनामाईट या स्फोटकाचा शोध लावला


🔹आल्फ्रेड नोबेल

-जन्म. -21 ऑक्टो1833

-मृत्यू  -10 डिसे1896


🔸1901 पासून आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ  दरवर्षी 10 डिसेंबर रोजी  हा पुरस्कार दिला जातो


🔹पहिले भारतीय व्यक्ती : रविंद्रनाथ टागोर


🔸पहिल्या भारतीय महिला : मदर तेरेसा

Daily Questions


कोणत्या दिवशी ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा करतात?

(A) 29 सप्टेंबर

(B) 28 सप्टेंबर ✅✅

(C) 27 सप्टेंबर

(D) 26 सप्टेंबर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशाने “ह्वासोंग-8” नामक हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित केले?

(A) जपान

(B) दक्षिण कोरिया

(C) चीन

(D) उत्तर कोरिया ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या राज्यात ‘झोजीला खिंड बोगदा’ बांधण्यात येत आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) उत्तराखंड

(C) लडाख ✅✅

(D) सिक्कीम


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस’ साजरा करतात?


(A) 28 सप्टेंबर

(B) 29 सप्टेंबर

(C) 30 सप्टेंबर

(D) 01 ऑक्टोबर ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या दिवशी “जागतिक कृषि पशुधन दिवस’ साजरा करतात?


(A) 29 सप्टेंबर

(B) 30 सप्टेंबर

(C) 01 ऑक्टोबर

(D) 02 ऑक्टोबर ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या व्यक्तीने भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारला?


(A) व्हाइस अॅडमिरल विनय बधवार

(B) व्हाइस अॅडमिरल अधीर अरोरा ✅✅

(C) व्हाइस अॅडमिरल करमबीर सिंग

(D) व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या दिवशी ‘जागतिक पशु / प्राणी दिवस’ साजरा करतात?


(A) 04 ऑक्टोबर ✅✅

(B) 03 ऑक्टोबर

(C) 02 ऑक्टोबर

(D) 01 ऑक्टोबर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या कंपनीने मुंबईच्या ‘क्रेडिटमेट’ या नावाच्या डिजिटल ऋण प्रदान करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे 100 टक्के भागभांडवल विकत घेतले?


(A) व्हॉट्सअॅप

(B) फोनपे

(C) गुगल पे

(D) पेटीएम ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या व्यक्तीला 2021 या वर्षासाठीचा ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ देण्यात आला?


(A) उर्मिला शर्मा

(B) हरदेव सिंह

(C) व्ही. एस. नटराजन ✅✅

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला?


(A) राजीव बन्सल ✅✅

(B) अजय कुमार

(C) विवेक कुमार देवांगन

(D) मृत्युंजय कुमार नारायण


कोण ‘चिल्ड्रन्स पीस इमेज ऑफ द इयर - ग्लोबल पीस फोटो अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरला?


(A) तरुण झा

(B) आध्या अरविंद शंकर ✅✅

(C) पूजा केडिया

(D) सौम्या रादेश वेडार्ट


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या कंपनीने "UFill" (यूफिल) नामक एका डिजिटल ग्राहक अनुभव सुविधेची सुरुवात केली?


(A) ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन

(B) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन

(C) हिंदुस्तान पेट्रोलियम

(D) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या ठिकाणी पहिले "विश्वकर्मा वाटिका" स्थापन करण्यात आले?


(A) रामपूर, उत्तर प्रदेश ✅✅

(B) अमरोहा, उत्तर प्रदेश

(C) बहराइच, उत्तर प्रदेश

(D) अलीगढ, उत्तर प्रदेश


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या रेल्वे उत्पादन एकक संस्थेने ‘रेल्वे कौशल्य विकास योजना’ याच्या अंतर्गत ‘सेल्फ-एम्प्लॉयमेंट टूलकिट’च्या वितरणासाठी एक कार्यक्रम आयोजित केला?


(A) इंटिग्रल कोच फॅक्टरी

(B) चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स

(C) बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स ✅✅

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


लडाखच्या कोणत्या जिल्ह्यात द्रास या नावाचे थंड हवेचे ठिकाण आहे?


(A) लेह जिल्हा

(B) कारगिल जिल्हा ✅✅

(C) बडगाम जिल्हा

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या व्यक्तीची 2021-22 या वर्षासाठी ‘जागतिक पोलाद संघ’ (WSA) याचे अध्यक्ष म्हणून निवड झाली?


(A) ए. के. गोयल

(B) सज्जन जिंदाल ✅✅

(C) जिओंग-वू चोइ

(D) यू योंग


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणता देशांनी "जाइंट सी 2021" नावाची नौकवायत आयोजित केली?


(A) चीन आणि रशिया ✅✅

(B) रशिया आणि भारत

(C) भारत आणि चीन

(D) जपान आणि चीन

CSAT मधील खात्रीशीर गुण मिळवून देणारा घटक म्हणजे 'निर्णय क्षमता व समस्या निराकरण

● सी सॅट मधील हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णय निर्धारण व समस्या समाधान.  एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुण दिले जात नाहीत. त्यामुळे चांगला स्कोअर करायचा असेल तर अधिकाधिक समर्पक उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

●  प्रश्न लक्षपूर्वक वाचून नेमकी समस्या समजून घ्यावी. प्रसंगातील पुढील महत्त्वाच्या ठळक बाबी लक्षात घ्याव्यात — प्रसंगातील नेमकी समस्या मांडणारे मुद्दे, संवेदनशीलतेने हाताळायचे मुद्दे, संबंधित व्यक्ती वा व्यक्तिगटांचे हितसंबंध, असल्यास वर्णन केलेल्या शक्यता, दिले असल्यास सामाजिक/ सांस्कृतिक/ आर्थिक/ राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे मुद्दे.

●  या प्रसंगातील तुमची नेमकी भूमिका कोणती आहे ते लक्षात घ्यावे. कोणतीही भूमिका स्पष्टपणे तुम्हाला दिलेली नसेल तर एक सुजाण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे हे समजून घ्यावे.

प्रसंगातील सर्वात कच्चा व मजबूत पक्ष कोणता ते लक्षात घ्यावे. राज्यघटनेतील तरतुदी व तत्त्वज्ञान, सर्वसाधारण नैतिकता व नैसर्गिक न्याय, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता यांच्या आधारे समतोल दृष्टिकोन व तटस्थता ठेवून याबाबतचे मूल्यमापन करावे.

●  दिलेले सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यावेत. वरील मूल्यमापनाच्या आधारे पूर्णपणे असंवेदनशील, बेजबाबदार, टोकाचे पर्याय बाद करावेत.

●  यानंतर योग्य वाटणाऱ्या पर्यायांच्या योग्यतेची श्रेणी ठरवावी. आपण निवडलेल्या उत्तराला तुलनात्मकरीत्या किती गुण मिळू शकतील याचा अंदाज येण्यासाठी पर्यायांचे श्रेणीकरण करण्याची सवय उपयोगाची ठरते.

●  पर्यायांची श्रेणी ठरवताना तुमच्या भूमिकेच्या अनुषंगाने पर्यायांमधील आवश्यकता, व्यवहार्यता विचारात घ्यावी. आवश्यक वाटू शकला तरी व्यवहार्य नसलेला पर्याय बाजूला ठेवावा. त्यानंतर असा पर्याय अमलात आणण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत का हे तपासावे. अशी अधिकारिता नसेल तर तो पर्याय योग्य असला तरी तुम्ही अमलात आणू शकत नसल्याने त्याची श्रेणी त्या भूमिकेपुरती कमीच गृहीत धरायला हवी. अशा श्रेणीकरणातून जास्तीत जास्त योग्य पर्यायापर्यंत पोचण्यास मदत होते.

●  उरलेल्या पर्यायातून जास्तीत जास्त सकारात्मक आणि बहुतांश हितसंबंधीयांना मान्य होऊ शकेल असा पर्याय शोधावा. असे दोन पर्याय आढळले तर जास्त दूरगामी परिणाम करणारा, कायमस्वरूपी तोडगा सांगणारा पर्याय निवडावा.

कोयना धरण



📌 •स्थान -

कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र


•सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी.


•लांबी -८०७.७२ मी


•उंची -१०३.०२ मी


•बांधकाम सुरू - १९५४-१९६७


•ओलिताखालील क्षेत्रफळ-  १२१०० हेक्टर


•जलाशयाचे नाव - शिवसागर जलाशय 


•क्षमता- २७९७.४ दशलक्ष घन


✅ कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.


•धरणाची माहिती-


बांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट

उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)

लांबी : ८०७.७२ मी

दरवाजे प्रकार : S - आकार लांबी : ८८.७१ मी.

सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद

संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)

पाणीसाठा क्षमता : २७९७.४ दशलक्ष

घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६

दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र :१२१०० हेक्टर

ओलिताखालील गावांची संख्या :९८ वीज उत्पादन [संपादन]


टप्पा १:

जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त

विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता :२६० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ६५मेगा वॅट [संपादन]


टप्पा २:

जलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त

विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता :३०० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ७५

मेगा वॅट [संपादन]

टप्पा 3:

जलप्रपाताची उंची : ४९६ मी. जास्तीतजास्त

विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता :१००० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X २५०मेगा वॅट


दरवाजे

प्रकार : S - आकार

लांबी : ८८.७१ मी.

सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद

संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)


🔰 •शिवसागर जलाशय


कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. 

हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न

परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.



पाणीसाठा-

क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर

वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर

ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर

ओलिताखालील गावे : ९८


वीज उत्पादन-


टप्पा १:


जलप्रपाताची उंची : ४७५ मी.

जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स

निर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट


टप्पा २:


जलप्रपाताची उंची : ४९० मी.

जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स

निर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट


टप्पा 3:


जलप्रपाताची उंची : ४९६ मी.

जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स

निर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे


🔶 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी


🔶 महात्मा गांधी - राजघाट


🔶 जवाहरलाल नेहरू - शांतीवन


🔶 लालबहादूर शास्त्री - विजय घाट


🔶 इदिरा गांधी - शक्ती स्थळ


🔶 बाबू जगजीवन राम - समता स्थळ


🔶 चौधरी चरण सिंग - किसान घाट


🔶 राजीव गांधी - वीरभूमी


🔶 गयानी झैलसिंह - एकता स्थळ 


🔶 चद्रशेखर - जननायक


🔶 आय. के. गुजराल - स्मृती स्थळ


🔶 अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल


🔶 क. आर. नारायण - उदय भूमी


🔶 मोरारजी देसाई - अभय घाट


🔶 शकर दयाल शर्मा - कर्मभूमी


🔶 गलझारीलाल नंदा - नारायण घाट


🔶 डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण

.. संस्था आणि संस्थापक....


🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज

🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज

🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज

🔸 १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज

🔹 १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज

🔸 १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज

🔹१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी

🔸 १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज

🔹१८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज

🔸 १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज

🔹१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज 

🔸१९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर

🔹 १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर

🔸 १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज

🔹 १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज


🔶.... सोसायटी (Society).... 🔶


🔹१७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी

🔸 १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी

🔹१८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी

🔸१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज

🔹१८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी

🔸 १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी

🔹१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी

🔸 १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी

🔹१८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी

🔸१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी

🔹 १८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी

🔸 १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी

🔹१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी

🔸१९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी

🔹१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी.

भारतातील ऐतिहासिक स्थळ

🏛अमरनाथ गुफा➖काश्मीर

🏛सर्य मन्दिर (ब्लैक पगोडा)➖ कोणार्क

🏛वहदेश्वर मन्दिर➖तन्जौर

🏛दिलवाड़ा मन्दिर, माउंट आबू

🏛आमेर दुर्ग➖जयपुर

🏛इमामबाड़ा➖ लखनऊ

🏛वन्दावन गार्डन➖मसूर

🏛चिल्का झील➖ओड़ीसा

🏛अजन्ता की गुफाएँ➖औरंगाबाद

🏛मालाबार हिल्स➖ मम्बई

🏛गोमतेश्वर मन्दिर श्रवणबेलगोला➖ कर्नाटक

🏛बलन्द दरवाजा➖ फतेहपुर सीकरी

🏛अकबर का मकबरा➖सिकन्दरा, आगरा

🏛जोग प्रपात➖मसूर

🏛शान्ति निकेतन➖ कोलकाता

🏛रणथम्भौर का किला➖सवाई माधोपुर

🏛आगा खां पैलेस➖पणे

🏛महाकाल का मन्दिर➖उज्जैन

🏛कतुबमीनार➖दिल्ली

🏛एलिफैंटा की गुफाएँ➖ मम्बई

🏛ताजमहल➖ आगरा

🏛इण्डिया गेट➖ दिल्ली

🏛विश्वनाथ मन्दिर➖वाराणसी

🏛साँची का स्तूप➖भोपाल

🏛निशात बाग➖शरीनगर

🏛मीनाक्षी मन्दिर➖मदुरै

🏠सवर्ण मन्दिर➖अमृतसर

🏠एलोरा की गुफाएँ➖औरंगाबाद

🏠हवामहल➖जयपुर

🏠जतर-मंतर➖दिल्ली,जयपुर

🏠शरशाह का मकबरा➖ सासाराम

🏠एतमातुद्दौला➖आगरा

🏠सारनाथ➖ वाराणसी के समीप

🏠नटराज मन्दिर➖ चन्नई

🏠जामा मस्जिद➖ दिल्ली

🏠जगन्नाथ मन्दिर➖ परी

🏠गोलघर➖ पटना

🏠विजय स्तम्भ➖चित्तौड़गढ़

🏠गोल गुम्बद➖बीजापुर

🏠गोलकोण्डा➖हदराबाद

🏠गटवे ऑफ इण्डिया➖ मम्बई

🏠जलमन्दिर➖ पावापुरी

🏠बलूर मठ➖ कोलकाता

🏠टावर ऑफ साइलेंस➖मम्बई

नाना जगन्नाथ शंकर सेठ (१८०३-१८६५)


✍️नाना शंकर सेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव "मुरबाड" हे होते.


✍️१८२२ मध्ये "बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी" या संस्थेची स्थापना त्यांनी केली. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका भारतीय मानसाने स्थापन केलेली ही पहीली संस्था होती. 

✍️या संस्थेच्या माध्यमातुन १८४८ मध्ये नाना शंकर सेठ यांनी मुंबई येथे मुलींची पहीली शाळा सुरु केली. (देशातील पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली)


✍️१८४५ मध्ये नाना शंकरसेठ यांनी मुंबई येथे ग्रँड मेडीकल कॉलेज" ची स्थापना केली. याच कॉलेजमधुन १८६१ पासुन वैद्यकिय शिक्षण मराठी भाषेतून देण्याची व्यवस्था केली.


✍️ 1845 मध्ये शंकरसेठ यांनी स्टुडंट लिटररी ॲन्ड सायंटीफिक सोसायटी ची स्थापना मुंबई येथे केली. 

✍️ १८५० ते १८५६ या कालावधीत मुंबई प्रांताच्या "बोर्ड ऑफ एज्युकेशन" चे ते सदस्य होते.


✍️ नाना शंकरसेठ यांनी मुंबई विद्यापीठाचे "फेलो" म्हणुन काम केले आहे. तसेच ते ब्रिटीश काळामध्ये भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळावर सदस्य होते.


✍️  बरिटीशांनी नाना शंकरसेठ यांच्या कामावर खुष होवुन त्यांना "जस्टीस ऑफ पिस" पदवी दिली. (जस्टीस ऑफ पिस म्हणजे जनतेस न्याय मिळावा म्हणुन राजाने नेमलेला प्रतिनिधी) 

✍️नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी "एल्फिस्टन हायस्कुल व कॉलेजची" स्थापना केली. 

तसेच आजचे मुंबईतील

जे. जे. हॉस्पीटल उभारण्यासाठी नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले होते.


✍️२६ ऑगस्ट १८५२ रोजी "बॉम्बे असोशिएशन" ही भारतातील पहीली राजकिय संघटना स्थापन केली.


✍️१८५७ मध्ये शंकरसेठ यांनी "दि जगन्नाथ शंकरसेठ फस्ट ग्रेड अँग्लो हायस्कुल" स्थापन केले. तसेच नाना जगन्नाथ शंकरसेठ हे मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे पहीले सदस्य होते.


✍️ नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचा मृत्यु ३१ जुलै १८६५ रोजी झाला.


✍️ मबईचा पहिला गव्हर्नर "एल्फिस्टन" हा होता. नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचे मुंबई गव्हर्नर सोबत असलेल्या संबंधामुळेच त्यांनी गर्व्हनर एल्फिस्टन यांच्या नावाने कॉलेज काढले होते.

घाट

 1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग

🚍 महाराष्ट्रात लांबी  : 5,858km 


🛣 NH 3 ( 391km) नाशिक-धुळे

🚔 मबई  ➖ आग्रा 


🛣 NH 4 (371km) पणे-सातारा

🚘 मबई  ➖ चन्नई.


🛣 NH 4B (27km सर्वात लहान)

🚖 नहावासेवा ➖ पळस्पे


🛣 NH 6  (686km मोठा) अकोला

🚔 धळे ➖ कोलकत्त्ता


🛣 NH 7 (2400km) नागपूर-वर्धा

🚘 वाराणसी ➖ कन्याकुमारी


🛣 NH 8 (128km) राजस्थान मधुन

🚖 मबई ➖ दिल्ली 


🛣 NH 9 (336km)

🚔 पणे ➖ विजयवाडा.



🛣 NH 13 (43km) सोलापूर

🚘 सोलापूर ➖ चित्रदुर्ग


🛣 NH 16 (30km) गडचिरोली

🚖 निझामाबाद ➖ जगदाळपूर


🛣 NH 17 (482km) मुंबई-गोवा

🚔 पणवेल ➖ मगळूर


🛣 NH 50 (192km) महाराष्ट्र फक्त

🚘 पणे ➖ नाशिक


🛣 NH 204 (126km) महाराष्ट्र

🚖 रत्नागिरी ➖ कोल्हापूर


🛣 NH 211 (400km) महाराष्ट्र

🚔 सोलापूर ➖ धळे 

वित्त आयोग :- कालावधी व अध्यक्ष

✓पहिला (1952-57)- के. सी. नियोगी


✓दुसरा (1957-62)- के. संथानाम


✓तिसरा (1962-66)- ए.के. चंद्रा


✓चौथा (1966-69)- पी.वी. रजमंनार


✓पाचवा (1969-74)- महावीर त्यागी


✓सहावा (1974-79)- ब्रह्मानंद रेड्डी


✓सातवा (1979-84)- जे. एम. शेलेट


✓आठवा (1984-89)- वाय. बी. चव्हाण


✓नववा (1989-95)- एन. के. पी. साळवे


✓दहावा  (1995-2000)- के. सी. पंत


✓अकरावा (2000-2005)- ए. एम. खुस्रो


✓बारवा (2005-2010)- सी. रंगराजन


✓तेरावा (2010-2015)- विजय केळकर


✓चौदावा(2015-2020)- वाय. वी. रेड्डी


✓पंधरावा (2020-25)- एन. के. सिंग

मानवी शरीर


1: हाडांची संख्या: 206

2: स्नायूंची संख्या: 639

3: मूत्रपिंडांची संख्या: 2

4: दुधाच्या दातांची संख्या: 20

5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)

6: हार्ट चेंबर क्रमांक: 4

7: मोठी धमनी: महाधमनी

8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी

9: रक्त पीएच: 7.4

10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33

11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7

12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6

13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14

14: कवटीतील हाडांची संख्या: 22

15: छातीत हाडांची संख्या: 25

16: हात मध्ये हाडांची संख्या: 6

17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72

18: हृदयातील पंपांची संख्या: 2

19: सर्वात मोठा अवयव: त्वचा

20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत

21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय

22: सर्वात लहान सेल: शुक्राणू

23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान

24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड

25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी

26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी

27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो

28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा

29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)

30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर

:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस

32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस

33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)

34: मानवी पायात हाडांची संख्या: 33

35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8

36: हातात हाडांची संख्या: 27

37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड

38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा

40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर

:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)

41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)

42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306

43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5

44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ

45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी

46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट

47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट

48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया

49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा

50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त

51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल

52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद

◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर

◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर

◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह

◆ द वॉल : राहुल द्रविड 

◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट

◆ ब्लॅक पर्ल : पेले

◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ

◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास

◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर

◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा

◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा

◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी

◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली

◆ जंम्बो : अनिल कुंबळे

◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल

◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह 

◆ अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा 

◆ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव

◆ अनब्रेकेबल : मेरी कॉम 

◆ द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह

◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा 

◆ प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर

◆ प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल

◆ द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह 

◆ सनी डेज् : सुनील गावसकर 

◆ द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली 

◆ अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग 

◆ नो स्पिन : शेन वॉर्न

◆ 281 अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण

◆ गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी

◆ माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद

◆ शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू 

◆ अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली

◆ एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा

◆ बिलीव्ह - सुरेश रैना