Thursday, 9 December 2021

कंपनी आणि स्थापना वर्ष

🎯 कंपनी आणि स्थापना वर्ष

▪ Tesla : 2003
▪ Lexus : 1989
▪ Hyundai : 1967
▪ Ferrari : 1939
▪ Toyota : 1937
▪ Volkswagen : 1937
▪ Nissan : 1933
▪ Volvo : 1927
▪ Mercedes-Benz : 1926
▪ Jaguar : 1922
▪ Mazda : 1920
▪ BMW : 1916
▪ Audi : 1909
▪ GM : 1908
▪ Ford : 1903
▪ Dodge : 1900
▪ Fiat : 1899
▪ Renault : 1898
▪ Peugeot : 1896
▪ Benz : 1883

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत उपयुक्त वनस्पती कोणती ?
तुळस.

राजवर्धनसिंह राठोड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
शूटींग.

सायकलचा शोध कोणी लावला ?
मॅकमीलन.

महाराष्ट्रातील औद्योगिक दृष्टया सर्वांत जास्त मागासलेला जिल्हा कोणता ?
गडचिरोली.

सर्वांत लहान पक्षी कोणता आहे ?
हमिंग बर्ड.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप होतो ?
प्लाझमोडियम.

गीत सेठी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बिलियर्ड्स.

ह्रदयरोपणाचा शोध कोणी लावला ?
डाॅ. ख्रिश्चन बनाॅर्ड.

भारतातील सर्वांत मोठे सरोवर कोणते ?
वूलर सरोवर.

लिंबूवर्गिय फळांमघ्ये कोणते जीवनसत्व असते ?
क जीवनसत्व.

/

रक्तवाहिन्या

● धमन्या (Arteries)

- हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद – फुफ्फुसधमनी (Pulmonary Artery) भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.
- शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.
- रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा असतो.
- महाधमनी – धमन्या – धमनिका

● शिरा (Veins)

- उतींकडून कार्बन डायॉकसाईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात. अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins) भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात.
- शरीरात त्वचेखाली स्थित असतात व झडपा असतात.
- रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा असतो.
- महाशिरा -शिरा – शिरिका

● केशिका (Capillaries)

- धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.
- केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.
- केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून येते

Science Special


★ जिवाणू (bacteria) :-

◆ साधारण एक पेशीय असतात.

◆ विषाणू पेक्षा आकाराने मोठे असतात.

◆ जिवाणू मध्ये केंद्रक नसते म्हणून गुणसूत्रे मुक्त असतात. टेलीग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ जिवाणूंना चांगली अशी पेशी रचना असते ज्यात पेशीभित्तिका, पेशीपटल तसेच पेशीरस व पेशीअंगके असतात.

◆ जिवाणू हे फायदेशीर पण असतात पण बहुतांश जिवाणू घातक असतात.

◆ पृथ्वीवर जिवाणू मानवापेक्षा जास्त काळापासून होते जिवाणू हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात.

◆ जमिनीमध्ये खोलवर तसेच अंतराळात जगू शकतात.

◆ एक प्रकारचा जिवाणू चंद्रावर दोन वर्ष जगण्याचा पुरावा मिळाला आहे.

★ फायदेशीर जिवाणू :-

◆ शिंबाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जिवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतीसाठी उपयोगात आणतात म्हणून रायझोबियम चा उपयोग जैविक खत म्हणून करतात.

◆ आणि रायझोबियम अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात.

◆ मातीतील अझोटोबॅक्टर जिवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात. टेलीग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ लॅक्टोबॅसिलस दह्या मधील जिवाणू शरीरात पाणी पोहोचत नाही.

★ घातक जीवाणू :-

◆ स्टॅफिलोकोकस जिवाणु खाद्यपदार्थावर वाढताना एन्टोरो टॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करते त्यामुळे असे पदार्थ खाताच जुलाब उलट्या होतात.

◆ हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापराची मुदत संपली की त्यात क्लोस्ट्रिडियम जिवाणू वाढण्याची शक्यता असते.

◆ जेव्हा पदार्थावर बुरशी चढते तेव्हा त्यात मायको टॉक्झिन हे विष तयार होते

◆ क्लोस्ट्रिडियम यांच्या सुमारे 100 प्रजाती आहेत ते विनाॅक्सी परिस्थितीत वाढतात.

◆ बर्ड फ्लू हा H5N1 या विषाणूमुळे होतो.

नासा (National aeronautic & Space Administration-NASA)

🔖 1आॅक्टोबर 1958 पासुन संस्थेचे कामकाज चालु

🔖 स्थापना - 29 जुलै 1958

🔖 मुख्यालय - वॅशिंग्टन डी सी

🔖 सध्याचे अध्यक्ष - जिम ब्रिडेनस्टिन

🔹नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे.

🔹 अमेरिकेतील आधीच्या नॅशनल अ‍ॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेच्या जागी, नासा स्थापण्यात आली.

🔹शीतयुद्ध काळात सोव्हियत संघाच्या अंतराळ कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसनआवर आणि सिनेटर लिण्डन बी जॉन्सन यांनी नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या(नासा) स्थापनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला वेग दिला. आणि २९ जुलै १९५८ मध्ये ती अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत नासाने अनेक यशस्वी अंतराळ योजना राबवल्या आहेत.

🔹नासाने आपलं पहिलं अंतराळ यान एक्सप्लोअरर-१ हे १९५८ मध्ये लाँच केलं. या अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंत अनेक यशस्वी योजना राबवल्या असून चंद्रावर पहिलं मानवी पाऊल ठेवण्याचं श्रेय नासालाच जातं.

🔹 विराट विश्‍वाची ‘आभाळमाया’ नेमकी कशी आहे त्याचा ‘प्रत्यक्ष’ धांडोळा घेणारा एक शक्तिशाली ‘डोळा’ १९९० मध्ये ‘नासा’या अमेरिकेचा अवकाशविज्ञान संस्थेने अवकाशात पाठवला आणि त्याने दैदीप्यमान कामगिरी करून विश्‍वातील ग्रह, तारे, दीर्घिका, तेजोमेघ या सर्वांची लाखो तेजस्वी छायाचित्रं पृथ्वीकडे पाठवली.

आता मंगळावर जीवन आहे की नाही यासाठी या संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासा ही जगात अग्रस्थानी आहे.

हिवताप/ मलेरिया (Malaria)


💉 रोगकारक: हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो.

🎯परिणाम: रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.

🎯प्रसार: हिवतापाचा प्रसार ऍनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.

🎯लक्षणे: ठराविक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लिहा मोठ्या होणे, ऍनिमियाची कमी अधिक तीव्रता इत्यादी.

🔬 हिवतापाच्या अवस्था (Stages Of Malaria):

1) शीत अवस्था (Cold Stage): या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढतेल. ही  अवस्था 2-4 तास आढळते.

2) उष्ण अवस्था (Hot Stage): या अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश पर्यंत वाढते तसेच प्रचंड डोकेदुखी आढळते. ही अवस्था 2-6 तास आढळते.

3) घाम अवस्था (Sweat Stage): या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येतो. ही  अवस्था 15-20 मिनिट आढळते.

💉 लस: अर्टिमिसिलीन – कॉम्बिनेशन थेरपी (ACT), क्लोरोक्वाईन, मेफ्लोक्वाईन, डॉक्झीसायक्लिन, प्रायमाक्विन

🔬 जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही  औषधे सुचविली आहे.
____________________________________

✅ एका शब्दाचे अनेक अर्थ ✅

         
----------------------------------------------- -- 
          ☆अंतर - (१)मन 
                        (२)लांबी

          ☆अंक   -(१)मांडी
                        (२)आकडा (संख्या )

          ☆अंग     -(१) शरीर
                         (२) बाजू

          ☆कर      -(१)हात
                         (२)सरकारी सारा

          ☆ दंड     -(१)शिक्षा 
                         (२)बाहू

          ☆नाद      -(१)छंद
                         (२)आवाज

          ☆नाव     -(१)होडी 
                         (२)कशाचेही नाव

          ☆ गार    - (१)थंड
                         (२) बर्फाची गोटी

          ☆ चूक   - (१)दोष
                         (२)लहान खिळा

          ☆ जात  - (१)प्रकार  
                         (२)समाज

          ☆जोडा  - (१)जोडपे 
                         (२)बूट

           ☆धडा   - (१)पाठ  
                         (२)रिवाज     
              
           ☆ धनी  - (१)मालक
                         (२)श्रीमंत मनुष्य        
          
           ☆पत्र    -(१) पान 
                        (२) चिठ्ठी           
       
           ☆पास   -(१)उत्तीर्ण 
                        (२)परवाना        
         
           ☆ बाल  -(१)बालक
                        (२)केस

           ☆फळ   - (१)यश 
                         (२)झाडाचे फळ

           ☆रस     -(१)द्रवपदार्थ
                         (२)गोडी

            ☆रक्षा   -(१)राख
                         (२)रक्षण

            ☆ वचन -(१)भाषण 
                         (२)प्रतिज्ञा

            ☆वजन  -(१)भार
                          (२)मान

             ☆वळण - (१)वाकडा रस्ता
                            (२)प्रवृत्ती

             ☆वार    -(१)घाव
                          (२)दिवस

            ☆सुमन  - (१)फूल
                          (२)चांगले मन

             ☆हवा    -(१)वायू 
                           (२)पाहिजे असा

              ☆कलम -(१)लेखणी
                           (२)रोपांचे कलम

              ☆घट    -(१)मडके
                          (२)झीज

              ☆चक्र   - (१)चाक
                            (२)एक शस्त्र

              ☆चिमणी -(१)एक पक्षी 
                             (२)गिरणीचे धुराडे

                ☆ तट   -(१)किनारा 
                             (२) किल्ल्याची भिंत

                ☆ताव   -(१)तापविणे
                             (२)कागद

                ☆नग    -(१)पर्वत 
                             (२)वस्तू

                 ☆वात   -(१)वारा
                              (२)दिव्याची वात

                 ☆हार    -(१)पराभव 
                             (२)फुलांचा हार

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

   1) सावकारशाही    2) राजेशाही   
   3) सामंतशाही      4) जमीनदारशाही

उत्तर :- 3

2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
   1) आध्यात्मिक      2) अध्यात्मिक   
   3) आध्यात्मीक      4) अधात्मिक

उत्तर :- 1

3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?

   1) क्   2) ण्    3) ळ    4) क्ष्
उत्तर :- 3

4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

   1) पुर्नजन्म    2) पूर्ण जन्म    3) पुनर्जन्म    4) पुनर्जम्न

उत्तर :- 3

5) अचूक विधाने निवडा.

   अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
   ब) शब्दापासून पदे बनतात.
   क) पदापासून शब्द बनतात.
   1) फक्त अ अचूक  2) फक्त अ आणि क अचूक
   3) फक्त ब अचूक    4) फक्त क अचूक

उत्तर :- 3

6) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

7) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) संयुक्त क्रियापद    2) प्रयोजक क्रियापद
   3) अनियमित क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

8) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

   1) प्रयोजक      2) शक्य     
   3) सहाय्यक      4) अकर्तृक

उत्तर :- 2

9) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

   1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली      2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
   3) नेहमी त्यांचे असेच असते      4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

   1) केवलप्रयोगी      2) क्रियाविशेषण   
   3) शब्दयोगी अव्यय    4) नाम

उत्तर :- 3

दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity) :

· तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

· वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

· जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात.

· ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास 'दवबिंदू तापमान' म्हणतात. हवेमध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.

· हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच 'आर्द्रता' म्हणतात.

· ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

· एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास 'निरपेक्ष आर्द्रता' असे म्हणतात.

· सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

· हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्‍या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.

· हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा 'असंतृप्त' आहे असे म्हटतात.

· जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.

· याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.

· हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.

· हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान व तेच आकारमान त्याच तापमानास संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणार्याआ पाण्याचे वस्तुमान याच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात.

· सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात.

· दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.

· जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

· थंड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

· जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

· उंचावरून जाणार्‍या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा(त्राईल) दिसते. विमान उडत असताना इंजीनापासून निघणार्‍या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात.

जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते.

· जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयार सुद्धा होत नाही.

आर्किमिडीजचे तत्व :

· घन पदार्थ द्र्वात अंशत: किंवा पूर्णत: बुडाल्यास तो त्याच द्रवात बुडलेल्या आकारमानाएवढे द्रव बाजूला सारतो. यावेळी पदार्थाच्या वजनात घट होते. ही घट पदार्थाने बाजूला सारलेल्या द्र्वाच्या वजनाएवढी असते.

· हा निष्कर्ष आर्किमिडीज या विख्यात शास्त्रज्ञाने इ.स.पूर्व 332 मध्ये प्रस्थापित केला. याला 'आर्किमिडीज तत्व' असे म्हणतात.

· आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ व गणिती होते. बाथटबमध्ये उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना हा शोध लागला. 'युरेका'असे म्हणजेच 'मला मिळाले' असे म्हणत ते बाहेर आले होते.

· आर्किमिडीजचे तत्व जहाजे व पाणबुड्यांच्या रचनेसाठी उपयोगी पडते.

· दुग्धतामापी (Lactometer), आद्रतामापी (Hydrometer), यासारखी विविध उपकरणे याच तत्वावर आधारीत आहेत.

उष्णता

उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.

थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.

जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.

वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.

पाण्याचे असंगत आचरण=>

सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.

4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.

4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.

पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.

बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.

थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃  पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.

तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.

इलेक्ट्रॉनचा शोध

🔥1897 मध्ये, जे जे थॉमसन यांना आढळले की कॅथोड किरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा नसतात परंतु हायड्रोजन (सर्वात हलके अणू) पेक्षा 1,800 पट जास्त फिकट असलेले कण बनतात. 

🔥थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे कण कॅथोडमधील अणूमधून आले आहेत - ते सबटामिक कण होते. त्यांनी या नवीन कणांना कॉर्पसुल्स म्हटले परंतु नंतर ते बदलून इलेक्ट्रॉन केले गेले . 

🔥थॉमसन यांनी हे देखील दर्शविले की इलेक्ट्रोन फोटोइलेक्ट्रिक आणि किरणोत्सर्गी सामग्रीद्वारे सोडलेल्या कणांसारखेच होते . 

🔥 हे त्वरित ओळखले गेले की इलेक्ट्रॉन हे विद्युतीय प्रवाह वाहणारे कण आहेतधातूच्या तारा मध्ये. थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे इलेक्ट्रॉन त्याच्या उपकरणांमधील कॅथोडच्या अगदी अणूमधून उद्भवले , ज्याचा अर्थ असा की अणू नावाच्या सूचनेनुसार अणू अविभाज्य नसतात .

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...