Wednesday, 8 December 2021

पोलीस भरती प्रश्नसंच

📌हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

A. रोकड पिके
B. तेलबिया पिके
C. कडधान्य
D. तृणधान्य✅✅

📌खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते ?

A. बीट
B. ऊस ✅✅
C. गोड ज्वारी
D. मका.

📌महाराष्ट्र राज्यात __ हे तेलबियाचे पिक कोरडवाहू शेतीत घेतले जाते .

A. सूर्यफूल
B. करडई ✅✅
C. जवस
D. मोहरी

📌सध्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

वाघ✅✅
सिंह
हत्ती
चिता

📌"रिव्हाल्युशनरी" हे पत्रक कोणी सुरु केले?

रामकृष्ण बिस्मील
सचीद्रनाथ संन्याल✅✅
शहानाजखान
भगतसिंग

📌भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

डॉ. आंबेडकर
डॉ. राजेंद्रप्रसाद✅✅
पंडित नेहरू
लॉर्ड माऊंटबॅटन

📌कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो?

मुंबई
दिल्ली
कोलकत्ता✅✅
नागपूर

📌जगातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक भारतात राहतात....???

१० टक्के
१६ टक्के✅✅
२० टक्के
२९ टक्के

📌मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?


ब✅✅

📌कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो?

गाय
कुत्रा
उंदिर✅✅
मांजर

📌............ पासून अॅल्सुमिनिअम मिळवले जाते.

तांबे
बॉक्साइट✅✅
लोखंड 
मँगनिज

📌-------- या सरोवराची निर्मिती उल्कपातापासून झालेली आहे?

चिलका 
लोणार ✅✅
सांभर
पुलीकेत

📌राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?

१६
१७✅✅
१८
१९

📌लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ............ पासून मिळतात.

A .......कुटुंब
B .......शाळा
A+B ..दोन्हीही✅✅
D........मंदिर

📌भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात?

पंडित नेहरू ✅✅
डॉ. राजेंद्र प्रसाद
इंदिरा गांधी
महात्मा गांधी

📌खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे?

चेन्नई
कोलकाता
विशाखापट्टणम ✅✅
कांडला

📌रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात?

सल्फ्युरिक अॅसिड✅✅
मायट्रोजन ऑक्सीईड
हैड्रोक्लोरिक अॅसिड
अमितो आम्ल

📌दुलीप करंडक ही स्पर्धा कोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे?

(A) टेनिस
(B) क्रिकेट✅✅✅
(C) फुटबॉल
(D) बास्केटबॉल

📌कोणत्या संघाने दुलीप करंडक 2019 ही क्रिकेट स्पर्धा जिंकली?

(A) इंडिया रेड✅✅✅
(B) इंडिया ग्रीन
(C) इंडिया ब्लू
(D) इंडिया ब्लॅक

📌एका भारतीय वकील आणि माजी कायदा मंत्रीचे 8 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले. त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव काय होते?

(A) महेश जेठमलानी
(B) तीरथ दास डोगरा
(C) एच. आर. गोखले
(D) राम जेठमलानी✅✅✅

📌8 सप्टेंबर 2019 रोजी पाळलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा विषय काय आहे?

(A) लिटरसी अँड स्किल्स डेव्हलपमेंट
(B) लिटरसी अँड मल्टीलिंगुअॅलीझम✅✅✅
(C) लिटरसी इन ए डिजिटल वर्ल्ड
(D) रीडिंग द पास्ट, राइटिंग द फ्युचर

📌‘लष्करी औषधे’ या विषयावर शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य देशांची पहिली परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) शांघाय, चीन
(B) बिजींग, चीन
(C) ढाका, बांग्लादेश
(D) नवी दिल्ली, भारत✅✅✅

📌तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क कुठे उभारण्यात आले आहे?
(A) निर्मल, निजामाबाद जिल्हा
(B) जगतील, निजामाबाद जिल्हा
(C) लक्कमपल्ली, निजामाबाद जिल्हा
✅✅✅
(D) बेलगमपल्ली, निजामाबाद जिल्हा

📌चौथी ‘हिंद महासागर परिषद 2019’ कुठे आयोजित करण्यात आली?

(A) माले, मालदीव✅✅✅
(B) नवी दिल्ली, भारत
(C) नैरोबी, केनिया
(D) जिबूती

राज्यसेवा प्रश्नसंच

 आठ वर्षांहूनही अधिक काळानंतर, भारत 11 मे 2019 रोजी आरंभ होणार्‍या 58 व्या ‘व्हेनिस बिएनेल’ यात सहभागी होणार आहे. व्हेनिस बिएनेल हा कोणता कार्यक्रम आहे?

(A) जागतिक मॅरेथॉन

(B) धार्मिक सभा

(C) कला प्रदर्शन

(D) क्रिडा कार्यक्रम

Ans:-C


2019 सालाच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची संकल्पना काय आहे?

(A) युनिटींग वर्कर्स फॉर सोशल अँड इकनॉमिक अॅडवांसमेंट

(B) इंटरनॅशनल लेबर मुव्हमेंट सेलीब्रेशन

(C) बिल्ड द फ्यूचर इन सॉलिडरीटी, पीस अँड डिसेंट वर्क ऑफ कॅमेरून

(D) कोणतीही नाही

Ans:-A


कोणाला फुटबॉल रायटर्स असोसिएशन (FWA) या संस्थेकडून ‘2019 फुटबॉलर ऑफ द इयर’ हा सन्मान दिला गेला?

(A) हॅरी केन

(B) डेले अॅली

(C) जॉन स्टोन्स 

(D) रहीम स्टर्लिंग

Ans:-D


कोणत्या राष्ट्रीय सरकारकडून तालिबानशी शांतता करार करण्यासाठी युद्धसमाप्ती व अमेरिकेच्या प्रयत्नांविषयी चर्चा करण्यासाठी ‘लोया जिरगा’ ही महासभा भरविण्यात आली?

(A) पाकिस्तान

(B) संयुक्त अरब अमीरात

(C) अफगाणिस्तान

(D) इराण

Ans:-C


कोणती दूरसंचार कंपनी भारतातल्या तीन सर्वात मोठ्या दूरसंचार कंपन्यांमध्ये येत नाही?

(A) रिलायन्स जियो

(B) भारती एअरटेल

(C) व्होडाफोन-आयडिया

(D) भारत संचार निगम लिमिटेड

Ans:-D


कोणत्या राज्याने NITI आयोगाच्या ‘SDG भारत’ निर्देशांकाच्या संयुक्त निर्देशांकात प्रथम स्थान मिळवले?

(A) महाराष्ट्र

(B) हिमाचल प्रदेश

(C) चंदीगड

(D) केरळ

Ans:-D


'द थर्ड पिलर – हाऊ मार्केट्स अँड स्टेट्‍स लीव्ह द कम्युनिटी बिहाइंड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) रघुराम राजन

(B) उर्जित पटेल

(C) डी. सुबाराओ

(D) शक्तीकांत दास

Ans:-A


‘आंध्रप्रदेश राज्य मानवाधिकार आयोग’चे पहिले अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीचे 1 एप्रिल रोजी निधन झाले. त्या व्यक्तीचे नाव ओळखा.

(A) बी. सुभाषन रेड्डी

(B) दलवीर भंडारी

(C) राघेंद्र सिंग

(D) एम. वेंकट रामन कुमारीA

Ans:-A


कोणत्या अनुसूचीत व्यवसायिक बॅंकेनी निर्यातक समुदायासाठी ‘जस्ट ए डॉलर’ खाता ही विशेष चालू खाता सेवा सुरू केली?

(A) करूर वैश्य बँक

(B) लक्ष्मी विलास बँक

(C) रत्नाकर बँक

(D) साऊथ इंडियन बँक

Ans:-B


पाकिस्तानात वास्तव्यास असणार्‍या कोणत्या व्यक्तीला एप्रिल 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिबंध यादीत दहशतवादी म्हणून सामील करण्यात आले?

(A) मसूद अझहर

(B) अबू सय्यफ

(C) अब्दुर रहमान

(D) बांगला भाई

Ans:-A


कोणत्या ठिकाणी 29-30 एप्रिल 2019 रोजी 'सायबर एक्सरसाइज ऑन सिनारियो बिल्डिंग अँड रिस्पॉन्स' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) गुरूग्राम

(D) हैदराबाद

Ans:-B


कोणत्या देशांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि लष्करी शासकांनी 'ट्रान्सिशनल मिलिटरी कौन्सिल (TMC)' नावाने संयुक्त नागरी-सैन्य परिषदेची स्थापना करण्यास मान्यता दिली?

(A) अफगाणिस्तान

(B) अंगोला

(C) सुदान

(D) माली

Ans:-C


9 जुलै ते 16 जुलै 2019 यामधील एका दिवशी भारताची ‘चंद्रयान-2’ मोहीम एक लँडर पाठवविणार आहे. त्या लँडरचे नाव काय आहे?

(A) प्रज्ञान

(B) सुजान

(C) द्रुष्टी

(D) विक्रम

Ans:-D


कोणत्या देशाने सार्वभौमिक इंटरनेट कायदा मंजुर केला आहे ज्यामुळे परदेशी सर्व्हरपासून दूर ठेवण्यासाठी प्राधिकरणांना देशाचे इंटरनेट वेगळे करण्यास परवानगी मिळेल?

(A) रशिया

(B) ब्रिटन

(C) युरोपीय संघ

(D) अमेरीका

Ans:-A


दुर्गम भागात वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी आफ्रिकेच्या कोणत्या देशात जगातली सर्वात मोठी ड्रोन वितरण सेवा सुरू करण्यात आली?

(A) अल्जेरीया

(B) इथियोपिया

(C) घाना

(D) इजिप्त

Ans:-C


कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी ग्रॅफेन क्वांटम डॉट्सचा वापर करुन अल्ट्रासेन्सिटीव्ह क्वांटम थर्मामीटर विकसित केले, जे 27 डिग्री सेल्सियस ते उणे 196 डिग्री सेल्सियस दरम्यान निश्चितपणे मोजू शकते?

(A) CSIR, चंदीगड

(B) दिल्ली विद्यापीठ

(C) IIT कानपूर

(D) जामिया मिलिया इस्लामिया

Ans:-D


ICCच्या ताज्या वार्षिक क्रमवारीत कोणत्या देशाला कसोटी क्रिकेट वर्गात पहिले स्थान मिळाले?

(A) पाकिस्तान

(B) भारत

(C) इंग्लंड

(D) न्युझीलँड

Ans:-B


कोणती कंपनी 100 पेक्षा अधिक सेवा उपलब्ध असलेले "सुपर अॅप" या नावाचे जगातले सर्वात मोठे ऑनलाइन-टू-ऑफलाइन नवे ई-वाणिज्य व्यासपीठ तयार करीत आहे?

(A) अॅमेझॉन

(B) वॉलमार्ट-फ्लिपकार्ट

(C) व्होडाफोन

(D) रिलायन्स इंडस्ट्रीज

Ans:-D


कोणत्या शहरात आशियाई विकास बँकचे मुख्यालय आहे?

(A) टोकियो

(B) मनिला

(C) दिल्ली

(D) बिजींग

Ans:-B


2018 सालाचा ‘ACJ अन्वेषण पत्रकारिता पुरस्कार’ कोणी जिंकला आहे?

(A) रवीश कुमार

(B) शेरीन भान

(C) सागरिका घोष

(D) निलीना एम. एस.

Ans:-D


कोणाला भारत-फ्रान्स अंतराळ सहकार्यामध्ये योगदान देण्यासाठी फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार दिला गेला?

(A) बी. एन. सुरेश

(B) के. राधाकृष्णन

(C) ए. एस. किरण कुमार

(D) कैलासवादीवू सिवान

Ans:-C


कोणती मोहीम भारत 2020 साली सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवविणार आहे?

(A) मून इंपॅक्ट यान

(B) आदित्य-L1

(C) चंद्रयान 2

(D) सन प्रोब 1

Ans:-B


कोणत्या शहरात आशियाई युवा महिला हँडबॉल अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) जयपूर

(D) हैदराबाद

Ans:-C


भारतीय रोखे व विनिमय महामंडळाने (SEBI) कोणत्या स्टॉक एक्सचेंजला 2009 सालापासून माहिती सामायिक करण्यासंदर्भात घटक असलेल्या सर्व तृतीय पक्षीय करारांचे पुनरावलोकन करण्याची सुचना दिली आहे?

(A) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज

(B) नॅशनल स्टॉक एक्सचेंज

(C) टोकियो स्टॉक एक्सचेंज

(D) लंडन स्टॉक एक्सचेंज

Ans:-B


कोणत्या विकास बँकेनी आशिया व प्रशांत क्षेत्रासाठी स्वस्थ महासागर आणि शाश्वत नील अर्थव्यवस्थांच्या संदर्भात एक कृती योजना राबवविण्यास सुरुवात केली आहे?

(A) जागतिक बँक

(B) BRICS बँक

(C) आशियाई विकास बँक

(D) आशिया पायाभूत गुंतवणूक बँक

Ans:-C


भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

(A) ड्रगान मिहीलोव्हीच

(B) कुलदीप सारंग

(C) एंजेलो सँड्र्यूज

(D) अमित राणा

Ans:-A


कोणाचा थायलँडच्या नव्या राजाच्या रूपात औपचारिकपणे राज्याभिषेक झाला?

(A) सी रतना सतसादराम

(B) महा वजीरालोंगकोर्न

(C) भूमिबोल अद्युल्यदेज

(D) यापैकी नाही

Ans:-B


RBIने अलीकडेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) प्रदान करणार्‍या कंपन्यांना दंड ठोठावला आहे. खालीलपैकी कोणत्या सेवा प्रदात्याला हा दंड दिला गेला नाही?

(A) मोबाइल पेमेंट्स

(B) व्होडाफोन एम पेसा

(C) फोन पे

(D) मनीग्राम

Ans:-D


कोणते राज्य 24 तास दुकाने आणि व्यवसायांना उघडे ठेवण्यास परवानगी देणारे प्रथम भारतीय राज्य ठरले?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) उत्तरप्रदेश

(D) गुजरात

Ans:-D


कोणत्या भारतीय उच्च न्यायालयाने ‘झीरो पेंडन्सी’ न्यायालय प्रकल्प नावाचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली?

(A) मुंबई उच्च न्यायालय

(B) दिल्ली उच्च न्यायालय

(C) अलाहाबाद उच्च न्यायालय

(D) हैदराबाद उच्च न्यायालय

Ans:-B


आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे ड्रॅगन अंतराळ यान कोणत्या कंपनीच्या मालकीचे आहे?

(A) नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन

(B) स्पेस एक्स

(C) भारतीय अंतराळ संशोधन संस्था

(D) युरोपियन स्पेस एजन्सी

Ans:-B


बातम्यांमध्ये पाहीले गेलेले जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रिफरन्सेस (GSP) ही व्यवस्था कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) रशिया

Ans:-A


कोणत्या व्यक्तीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) याच्या प्रथम स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?

(A) जयश्री व्यास

(B) ऊर्मिला थापर

(C) वर्षा कपूर

(D) ज्योती राय

Ans:-A


खालीलपैकी कोणती स्कॉर्पियन श्रेणीतली पाणबुडी नाही?

(A) INS कलवरी

(B) INS वेला

(C) INS खांडेरी

(D) INS कोलकाता

Ans:-D


2019 साली पोलीस दलांच्या आधुनिकीकरणासाठी गृह मंत्रालयाने किती राज्यांना प्रोत्साहन भत्ता दिला?

(A) 12

(B) 11

(C) 10

(D) 9

Ans:-C


कोणता देश जी-7 समुहाचा भाग नाही?

(A) चीन

(B) इटली

(C) संयुक्त राज्ये अमेरिका

(D) जर्मनी

Ans:-A


2018 साली अमेरिका-भारत यांच्यातली व्यापारातली तूट ...... एवढी होती.

(A) 11.3 अब्ज डॉलर

(B) 21.3 अब्ज डॉलर

(C) 31.3 अब्ज डॉलर

(D) 41.3 अब्ज डॉलर

Ans:-B


कोणत्या देशाकडून मे महिन्यात होणार्‍या 200 अब्ज डॉलर एवढ्या किंमतीच्या मालाच्या आयातीवर आयात शुल्क वाढविण्याची घोषणा अमेरिकेनी केली?

(A) रशिया

(B) चीन

(C) भारत

(D) इराण

Ans:-B


कोणता देश शांघाय सहकार संघटनेचा पूर्ण सदस्य नाही?

(A) कझाकिस्तान

(B) किर्गिजस्तान

(C) अफगाणिस्तान

(D) रशिया

Ans:-C


गेल्या काही महिन्यांपासून बातम्यात असलेल्या VVPAT या संज्ञेचे पूर्ण स्वरूप काय आहे?

(A) व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल

(B) व्होटर व्हेरिफिकेशन पेपर ऑथेंटीसीटी ट्रेल

(C) व्होटर व्हेरिफाइड प्रोसेस ऑडिटींग टेक्नॉलॉजी

(D) यापैकी कोणतेही नाही

Ans:-A


छत्तीसगड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाला शपथ देण्यात आली?

(A) टी. एस. ठाकूर

(B) एच. एल. दत्तू

(C) पी. आर. रामचंद्र मेनन

(D) अशोक खेमका

Ans:-C


2019 साली कोणत्या तारखेला जागतिक दमा दिन पाळला गेला?

(A) 08 मे

(B) 07 मे

(C) 06 मे

(D) 01 मे

Ans:-B


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019 साली अमेरिकेच्या कोणत्या रहिवासीला ‘प्रेसिडेंशीएल मेडल ऑफ फ्रीडम’ हा सन्मान देवून सन्मानित केले?

(A) नोम चॉम्स्की

(B) टायगर वूड्स

(C) जेफ बेझोस

(D) टिम कूक

Ans:-B


कोणत्या देशात ‘SCO परराष्ट्र मंत्री परिषद 2019’ भरविण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) किर्गिजस्तान

(D) पाकिस्तान

Ans:-C


‘चार मे’ चळवळ (सन 1919) कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans:-B


कोणत्या राज्याने ‘जांभळा बेडूक’ हा राज्य उभयचर प्राणी म्हणून घोषित केला?

(A) कर्नाटक

(B) तामिळनाडू

(C) महाराष्ट्र

(D) केरळ

Ans:-D


भारतीय रिझर्व्ह बँकेनी गृहकर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात पुढील विधाने वाचा आणि अचूक विधान ओळखा. 


I. सहकारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी गृहकर्जाची मर्यादा वाढविण्यात आली.

II. नवीन मर्यादेच्या अंतर्गत, महानगर क्षेत्रामध्ये व्यक्तीला 35 लक्ष रुपयांपर्यंतचे गृहकर्ज दिले जाईल.

(A) केवळ I

(B) केवळ II

(C) I आणि II दोन्ही

(D) ना I आणि ना II

Ans:-B


भारतातल्या विद्यमान शाळांच्या पर्यावरणविषयक कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी GRIHA कडून एक मानांकन देणारे साधन जाहीर केले आहे. त्याचे नाव ओळखा.

(A) GRIHA फॉर एक्जिस्टिंग स्कूल्स

(B) GRIHA फॉर एक्जिस्टिंग डे स्कूल्स

(C) GRIHA फॉर स्कूल्स

(D) GRIHA फॉर एज्युकेशनल स्कूल्स

Ans:-B


मध्य अमेरिकेमधील एका देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून लॉरेंटिनो कॉर्टिझो निवडून आले. त्या देशाचे नाव ओळखा.

(A) कोलंबिया

(B) व्हेनेझुएला

(C) कॅनडा

(D) पनामा

Ans:-D


2019 साली 8 मे रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक रेड क्रॉस दिनाची संकल्पना काय होती?

(A) लव ह्यूमॅनिटी

(B) अक्रॉस द वर्ल्ड

(C) लव

(D) सर्व्ह विदाउट बॉर्डर

Ans:-C


कोणता शेजारी देश भारतासोबत शेख मुजीबूर रहमान यांच्या जीवनकार्यावर चित्रपट तयार करण्यासाठी सहमत झाला?

(A) बांग्लादेश

(B) नेपाळ

(C) म्यानमार

(D) श्रीलंका

Ans:-A


रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळीचे संस्थापक कोण आहेत?

(A) हेनरी डयूनेन्ट

(B) फ्रेडरिक पासी

(C) बर्था वॉन सत्नेर

(D) कोफी अन्नान

Ans:-A

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 कोणते मोबाइल अॅप डाउनलोड करण्यावर बंदी घालण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला?

(A) फेसबुक मॅसेंजर

(B) टीक-टॉक

(C) लाईव्ह

(D) व्हीव

Ans:-B


नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध नाटककार कार्तिक रथ कोणत्या राज्याचे रहिवासी होते?

(A) ओडिशा

(B) महाराष्ट्र

(C) कर्नाटक

(D) पश्चिम बंगाल

Ans:-A


RBIच्या मंजुरीनंतर कोणती बँक इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (IHF) लिमिटेड कंपनीबरोबर विलीन केली जाईल?

(A) देना बँक

(B) बंधन बँक

(C) लक्ष्मी विलास बँक

(D) एक्सिस बँक

Ans:-C


ब्रिटिश भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान कोहिमाची लढाई झाली होती?

(A) जर्मनी

(B) जपान

(C) टर्की

(D) इटली

Ans:-B


अलीकडेच कोहिमाच्या लढाईचे 75 वे वर्धापन वर्ष भारतात साजरे करण्यात आले. ही लढाई कोणत्या युद्धात झाली होती?

(A) प्रथम महायुद्ध

(B) दुसरे महायुद्ध

(C) भारत-चीन युद्ध

(D) यापैकी नाही

Ans:-B


परदेशी दहशतवादी संघटना म्हणून रिव्हॉलूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) याला घोषित करणे ही अमेरिकेच्या प्रशासनाची योजना आहे. IRGC कोणत्या देशाची सुरक्षा संस्था आहे?

(A) सिरिया

(B) इराण

(C) मलेशिया

(D) टर्की

Ans:-B


“सारी-अरका-अॅंटी टेरर 2019” हा कोणत्या आंतरराष्ट्रीय समूहाचा पहिला संयुक्त लष्करी सराव आहे?

(A) NATO

(B) NAFTA

(C) SCO

(D) SAARC

Ans:-C


‘सेंडाई कार्यचौकट 2015-2030’ कश्या संदर्भात आहे?

(A) स्मारकांचे संवर्धन

(B) पाणथळ प्रदेशांचे संवर्धन

(C) आपत्ती जोखीम कमतरता

(D) वरील सर्व

Ans:-C


कोणत्या शहरात आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा संदर्भात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा (IWDRI) आयोजित करण्यात आली होती?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) उदयपूर

Ans:-A


‘हायाबुसा-2’ या मानवरहित जपानी अंतराळयानाने पृथ्वीच्या उत्पत्तीशी संबंधित आश्चर्यकारक शोध लावण्यासाठी कशाची परिक्रमा केली?

(A) लघुग्रह

(B) मंगळ

(C) चंद्र

(D) गुरु

Ans:-A


पुढीलपैकी कोणते ‘ज्युडिशिएल ओव्हररीच’ (न्यायिक अतिरेक) या प्रकाराचे उदाहरण आहे?

(A) उच्च न्यायालयातर्फे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करणे व बढती देणे

(B) जेव्हा सरकार योग्य योजना तयार करण्यात अपयशी ठरते तेव्हा उच्च न्यायालयाद्वारे सरकारी योजना तयार करणे

(C) उच्च न्यायालयाद्वारे खटला चालविण्यासाठी खालच्या न्यायालयांच्या निर्णयांचे खंडण करणे

(D) यापैकी नाही

Ans:-B


कोणत्या देशात हूतू आणि तुत्सी समाजाचे लोक आहेत?

(A) इजिप्त

(B) युगांडा

(C) रवांडा

(D) भुटान

Ans:-C


2018 साली परदेशातून मायदेशी पैसे पाठविण्याच्या बाबतीत कोणत्या देशाने सर्वाधिक रक्कम प्राप्त केली?

(A) चीन

(B) बांग्लादेश

(C) भारत

(D) मलेशिया

Ans:-C


कोणत्या पुरुष बॅडमिंटनपटूने ‘मलेशियन ओपन 2019’ ही स्पर्धा जिंकली?

(A) श्रीकांत किदांबी

(B) सोन वान हो

(C) लिन डॅन

(D) चेन लाँग

Ans:-C


आफ्रिकेतल्या कोणत्या देशात 1994 साली झालेल्या हत्याकांडामध्ये बळी गेलेल्या 8 लक्षापेक्षा अधिक लोकांच्या स्मृतीत 100 दिवसांचा शोक पाळण्याचे घोषित केले गेले?

(A) युगांडा

(B) रवांडा

(C) केनिया

(D) काँगो

Ans:-B


मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

(A) नरेश हरिशचंद्र पाटील

(B) डी. के. गुप्ता

(C) ए. एस. बोपन्ना

(D) प्रदीप नंदराजोग

Ans:-D


भारताच्या कोणत्या भौगोलिक ठिकाणी कुरिंजी किंवा नीलकुरिंजी वनस्पती आढळते?

(A) पश्चिम घाट

(B) पूर्व घाट

(C) हिमालय

(D) ईशान्य भारत

Ans:-A


‘लोकसभा निवडणूक 2019’ यासाठी प्रथम मतदान कोणी केली?

(A) इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP)

(B) अनिवासी भारतीय (NRI)

(C) सीमा सुरक्षा दल

(D) यापैकी नाही

Ans:-A


कोणत्या व्यक्तीला होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक मानले जाते?

(A) हिप्पोक्रेट्स

(B) क्रिस्टीएन बर्नार्ड

(C) सॅम्युअल हॅनिमेन

(D) जोनास साल्क

Ans:-C


कोणत्या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन पाळण्यात येतो?

(A) 9 एप्रिल

(B) 10 एप्रिल

(C) 11 एप्रिल

(D) 30 मार्च

Ans:-C


कोणते मोबाइल अॅप डाउनलोड करण्यावर बंदी घालण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला?

(A) फेसबुक मॅसेंजर

(B) टीक-टॉक

(C) लाईव्ह

(D) व्हीव

Ans:-B


कोणत्या देशाने ‘सुलतान अझलन शहा चषक 2019’ या हॉकी स्पर्धेचा किताब पटकावला?

(A) भारत

(B) मलेशिया

(C) इंडोनेशिया

(D) दक्षिण कोरिया

Ans:-D


नोट्रे डेम कॅथेड्रल ही यूनेस्को जागतिक वारसा साइट आहे जिचे अलीकडे आग लागून नुकसान झाले,ती खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

(A) पॅरिस

(B) रोम

(C) वियेना

(D) व्हॅटिकन सिटी

Ans:-A



खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेने अमेरिकेच्या सैन्याला मध्यपूर्वी दहशतवादी म्हणून लेबल केले आहे?

(A) संयुक्त अरब अमीरात

(B) येमेन

(C) इराण

(D) इराक

Ans:-C



पुढीलपैकी कोणत्या संघटनेने 'फेस ऑफ डिजास्टर्स 2019 रिपोर्ट' अहवाल जाहीर केला?

(A) जागतिक बँक

(B) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)

(C) जागतिक आर्थिक मंच

(D) पर्यावरण आणि विकास साठी सहायक उद्योजक (SEEDS)

Ans:-D



खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडे रिसर्च उपग्रह रावण-1 लॉन्च केला?

(A) चीन

(B) श्रीलंका

(C) बांगलादेश

(D) भारत

Ans:-B



फिएडरेशन इंटरनेशनेल डी फुटबॉल असोसिएशनने (FIFA) ........... यांच्यावर बंदी घातली आहे.

(A) जोस मारिया मारिन

(B) रोनाल्डो

(C) रोनाल्डिन्हो

(D) डगलस कोस्टा

Ans:-A



नासाच्या उपग्रहाने प्रथमच पुढीलपैकी पृथ्वी-आकाराचा कोणता ग्रह HD 21749b शोधला?

(A) AQUA

(B) TESS

(C) JUNO

(D) IMAGE

Ans:-B


NASAची प्रथम महिला अंतराळवीर कोण होती?

(A) सुनिता विल्यम्स

(B) कल्पना चावला

(C) जेरी कॉब

(D) अॅगथा मार्टिन्स

Ans:-C



चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू (IFR) या कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी होणार आहे?

(A) INS वज्र

(B) INS प्रहार

(C) INS विक्रांत

(D) INS कोलकाता

Ans:-D



कोणते शैक्षणिक मंडळ 2020 सालापासून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दृष्टीसाठी उपयोगी साधने वापरण्यास परवानगी देणार आहे?

(A) बिहार उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ

(B) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

(C) आंतरराष्ट्रीय परीक्षा मंडळ

(D) भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद

Ans:-B



नुकताच प्रसिद्ध झालेला म्यूलर अहवाल कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(A) जर्मनी

(B) भारत

(C) फ्रान्स

(D) संयुक्त राज्ये अमेरिका

Ans:-D




आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किती वेळत पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करतो?

(A) 24 तास

(B) 160 तास

(C) 365 दिवस

(D) 90 मिनिटे

Ans:-D



कोणत्या उद्देशाने 17 एप्रिल 2019 रोजी NASA कडून एंटेरिस अग्निबाण अंतराळात सोडण्यात आले?

(A) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) कडे सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठीची मोहीम

(B) मंगळ मोहिमेच्या पूर्वीची चाचणी

(C) शुक्रासाठीची मानवसहित मोहीम

(D) यापैकी कोणतेच नाही

Ans:-A



20 एप्रिल 2019 रोजी अनावरण करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजाचे नाव काय आहे, जे मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणालीने सुसज्जित आहे?

(A) इम्फाल

(B) डिस्ट्रॉयर

(C) बज्रपती

(D) बृहस्पती

Ans:-A


कोणत्या दिवशी विश्व पृथ्वी दिन पाळण्यात येतो?

(A) 1 मे

(B) 22 एप्रिल

(C) 22 मे

(D) 1 एप्रिल

Ans:-B




कोणत्या तारखेला भारतात नागरी सेवा दिन साजरा केला जातो?

(A) 22 मार्च

(B) 22 एप्रिल

(C) 21 मार्च

(D) 21 एप्रिल

Ans:-D



अंदमान व निकोबार द्वीपसमूहांच्या प्रदेशात प्रथमच आढळून आलेले हॉर्सफील्डचे ब्रोंझ कुकू हे पक्षी मुळात कोणत्या देशात आढळून येतात?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका

(B) ब्राझील

(C) इंडोनेशिया

(D) ऑस्ट्रेलिया

Ans:-D



कोणता रेणू आपल्या विश्वातला सर्वात प्राचीन रेणू मानला जातो?

(A) ओझोन

(B) हायड्रोजन

(C) हिलियम हाइड्राइड आयन

(D) लोह

Ans:-C


कोणत्या देशात 23 वी ‘आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली?

(A) संयुक्त अरब अमिरात

(B) चीन

(C) भारत

(D) कतार

Ans:-D



ईस्टर संडे या सणाच्या दिवशी कोणत्या आशियाई देशात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले?

(A) चीन

(B) इंडोनेशिया

(C) श्रीलंका

(D) नेपाळ



Ans:-C


कोणत्या खेळाडूने ‘आशियाई अॅथलेटिक्‍स अजिंक्‍यपद 2019’ या स्पर्धेतले भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले?

(A) निरज चोप्रा

(B) हेमा दास

(C) जिन्सन जॉन्सन

(D) गोमती मरिमुथू

Ans:-D


कोणत्या देशाबरोबर सामायिक केलेल्या सीमेवर इराण एक संयुक्त सीमा सुरक्षा दल स्थापन करणार आहे?

(A) सिरिया

(B) टर्की

(C) पाकिस्तान

(D) इराक

Ans:-C


कोणत्या देशाकडून होणार्‍या कच्च्या तेलाच्या आयातीमुळे अमेरिका भारतावर 2 मे पासून निर्बंध लादणार आहे?

(A) सौदी अरब

(B) इराक

(C) इराण

(D) संयुक्त अरब अमिरात

Ans:-C


भारताच्या कोणत्या राज्यात गारिया सण साजरा केला जातो?

(A) त्रिपुरा

(B) मणीपूर

(C) आसाम

(D) झारखंड

Ans:-A


मॉस्कीरीक्स ही मलेरियावरची जगातली पहिली लस कोणत्या देशात उपलब्ध करून देण्यात आली आहे?

(A) मलावी

(B) भारत

(C) टांझानिया

(D) अमेरिका

Ans:-A


कोणत्या संस्थेच्या मदतीने AYUSH मंत्रालयाद्वारे ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी (TKDL) विकसित करण्यात आले?

(A) भारतीय उद्योग संघ

(B) जैवतंत्रज्ञान विभाग

(C) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद

(D) जागतिक आरोग्य संघटना

Ans:-C


भारतीय रिझर्व्ह बॅंक ...... डॉलर-रुपया स्वॅप लिलाव करतो.

(A) बँकांकडून अतिरिक्त डॉलर काढून घेण्यासाठी

(B) चलनामध्ये अत्याधिक वाढ टाळण्यासाठी

(C) बँकांना रुपयाची तरलता प्रदान करण्यासाठी

(D) सर्व

Ans:-D



कोणी 2019 सालासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार जिंकला?

(A) अरविंद गुप्ता

(B) प्रशांत झा

(C) बेनी अँटोनी

(D) के. जे. रामिया

Ans:-C



कोणत्या आंतरराष्ट्रीय गटाने पॅलेस्टिनी प्राधिकरणाला दरमहा 100 दशलक्ष डॉलर देण्याचे वचन दिले?

(A) SAARC

(B) ASEAN

(C) युरोपीय संघ

(D) अरब लीग

Ans:-D



कोणत्या साली प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) सुरू करण्यात आली?

(A) सन 2014

(B) सन 2015

(C) सन 2016

(D) सन 2017

Ans:-A



इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गोलन हाईट्स या प्रदेशातल्या नव्या समुदायाचे नाव …….. यांच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

(A) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

(B) भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी

(C) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लामिदीर पुतिन

(D) इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्तेह अल-सिसी

Ans:-A


Can you answer this?

भारतीय सरन्यायाधीशांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या तक्रार प्रकरणाची चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापना केलेल्या तीन सदस्यीय मंडळाचे प्रमुख कोण आहेत?

(A) दिपक मिश्रा

(B) रंजन गोगोई

(C) एस. ए. बोबडे

(D) यापैकी नाही

Ans:-C



दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन साजरा केला जातो?

(A) 25 एप्रिल

(B) 23 एप्रिल

(C) 23 मे

(D) 24 मे

Ans:-B



मोठ्या प्रमाणावर लोकांचा विरोध झाल्यानंतर पदावरून हटविण्यात आलेल्या अब्देलझीझ बौटेफ्लिका यांनी कोणत्या देशावर राज्य केले होते?

(A) सुदान

(B) ट्यूनीशिया

(C) अल्जेरिया

(D) चाड

Ans:-C



अरब स्प्रिंग 2.0 याला जगाच्या कोणत्या भागात सत्ताधीशांविरुद्ध झालेला जनतेचा विद्रोह मानला जातो?

(A) मध्य पूर्व

(B) उत्तर आफ्रिका

(C) मध्य आशिया

(D) (A) आणि (B)

Ans:-D



नासाच्या कोणत्या प्रोग्राम ने मंगल ग्रहावरील पहिले मार्सक्वॅक रेकॉर्ड केले आहे?

(A) डिस्कवरी प्रोग्राम

(B) मार्स प्रोग्राम

(C) ओरिजिन प्रोग्राम

(D) सीकर प्रोग्राम

Ans:-A



रवींद्रनाथ टैगोर साहित्य पुरस्कार 2019 निम्नलिखित लेखकों में से किसे दिया गया था?

(A) अनिता देसाई

(B) किरण देसाई

(C) झुम्पा लाहिरी

(D) राणा दासगुप्त

Ans:-D


जागतिक लसीकरण सप्ताह ...... च्या शेवटच्या आठवड्यात दरवर्षी साजरा केला जातो.

(A) मे

(B) जून

(C) जुलै

(D) एप्रिल

Ans:-D


अमेरिकेच्या दबावाखाली खालीलपैकी कोणत्या देशातून भारतात केली जाणारी तेल आयात थांबेल?

(A) इराक

(B) सौदी अरेबिया

(C) इराण

(D) मेक्सिको

Ans:-C


जागतिक मलेरिया दिवस जागतिक पातळीवर कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(A) 24 एप्रिल

(B) 25 एप्रिल

(C) 24 मे

(D) 25 जून

Ans:-B


मलेरिया खालील कोणत्या मादीच्या चाव्यामुळे होतो?

(A) आशियाई टाइगर मच्छर

(B) मार्श मच्छर

(C) हेमागोगस मच्छर

(D) एडीस मच्छर

Ans:-B


अलीकडेच संपन्न झालेल्या एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2019 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे.

(A) पहिला

(B) सेकंद

(C) तिसऱ्या

(D) चौथा

Ans:-D


खालीलपैकी कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे?

(A) संयुक्त राज्य

(B) ब्राझील

(C) चीन

(D) बांगलादेश

Ans:-B


नायट्रोजन सामग्री वाढवण्यासाठी दुध उत्पादनांमध्ये पुढीलपैकी कोणता रासायनिक पदार्थ मिसळला जातो?

(A) हायड्रोजन पेरोक्साइड

(B) बेन्झोईक एसिड

(C) सेलिसिलिक एसिड

(D) मेलामाइन

Ans:-D


सुरक्षित शहरे कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातले सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे?

(A) चेन्नई

(B) तिरुपती

(C) सूरत

(D) मुंबई

Ans:-A


UN-हॅबिटॅट या संघटनेचा सुरक्षित शहरे कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?

(A) वर्ष 1986

(B) वर्ष 1996

(C) वर्ष 2006

(D) वर्ष 2016

Ans:-B


जगातला सर्वात लठ्ठ आणि वजनदार पोपट कोणता आहे?

(A) कॉकटेल

(B) काकापो

(C) पीग्मी

(D) आशियाई सीटासिन

Ans:-B


कोणत्या खेळाडूंनी ‘आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत? 


I. पूजा रानी

II. अमित पांघल

III. दिपक सिंग

IV. कविंदर सिंह बिश्त


(A) केवळ I

(B) केवळ I आणि II

(C) I, II आणि IV

(D) केवळ II

Ans:-B


24 एप्रिल रोजी, विझिंजम बंदर येथे सातवे लक्ष्यभेदी जहाज तैनात करण्यात आले आहे, जे केरळजवळच्या समुद्रांमध्ये शोध व बचाव क्षमता वाढवेल. त्याचे नाव ओळखा.

(A) ICGS C-44

(B) ICGS C-441

(C) ICGS C-442

(D) ICGS C-443

Ans:-B


कोणत्या आर्थिक संघटनेनी दहशतवादविरोधी प्रयत्नांमधील भागीदारी मजबूत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) सोबत शिष्टाचारासंबंधी दस्तऐवजावर स्वाक्षरी केली?

(A) गल्फ कोऑपरेशन काऊंसिल

(B) साऊथ आफ्रिकन डेव्हलपमेंट कम्युनिटी

(C) युरोपीय संघ

(D) ब्रिटन

Ans:-C


2019 सालाच्या जागतिक बौद्धिक संपदा दिनाची संकल्पना काय होती?

(A) डिजिटल क्रिएटिव्हिटी: कल्चर रिइमॅजीण्ड

(B) इनोव्हेशन – इम्प्रूव्हींग लाईव्हज

(C) पॉवरिंग चेंज: विमेन इन इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी

(D) रिच फॉर गोल्ड: IP अँड स्पोर्ट्स

Ans:-D


कोणत्या देशाद्वारे त्याची काफला प्रणाली समाप्त केली जाणार आहे?

(A) इराण

(B) इंडोनेशिया

(C) कतार

(D) सौदी अरब

Ans:-C


कोणत्या भारतीय संशोधन संस्थेनी भारतातून 2030 सालापर्यंत मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने ‘मलेरिया निर्मूलन संशोधन संघ (MERA) भारत’ तयार केला?

(A) अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था

(B) राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था

(C) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

(D) भारतीय वैद्यकीय परिषद

Ans:-C


ISISशी संबंधित कोणती संस्था श्रीलंकेच्या सरकारने बंदी घातली आहे?

(A) नॅशनल थौहीद जमात

(B) नॅशनल मुस्लिम लीग

(C) नॅशनल जमात

(D) यापैकी नाही

Ans:-A


उष्णकटिबंधीय चक्रीवादळांविषयी कोणते विधान अचूक आहे? 

I. उत्तर गोलार्धात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ घड्याळाच्या दिशेच्या उलट्या दिशेने चक्राकार फिरतात.

II. दक्षिण गोलार्धात कमी दाबाच्या पट्ट्यात उष्णकटिबंधीय चक्रीवादळ घड्याळाच्या दिशेने चक्राकार फिरतात.

III. घड्याळाची दिशा व उलटी दिशा कोरिओलिसच्या प्रभावामुळे असते.


(A) केवळ I आणि III

(B) केवळ II आणि III

(C) केवळ I आणि II

(D) I, II आणि III

Ans:-D


भारताच्या किनारपट्टीवरील कोणते राज्य फानी चक्रीवादळामुळे सर्वाधिक गंभीरपणे प्रभावित झाले?

(A) आंध्रप्रदेश

(B) तामिळनाडू

(C) कर्नाटक

(D) (A) आणि (B)

Ans:-D


कोणत्या देशाने भारताला बौद्धिक संपदा (IP) संदर्भातल्या ‘प्रायऑरिटी वॉच लिस्ट' या सूचित ठेवले आहे?

(A) जर्मनी

(B) जपान

(C) संयुक्त राज्ये अमेरिका

(D) चीन

Ans:-C


कोणते राज्य सरकार (राज्य वेतन दुरूस्ती समिती 2017 याच्या शिफारशीनुसार) 80 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची घोषणा केली?

(A) गोवा

(B) महाराष्ट्र

(C) बिहार

(D) उत्तरप्रदेश

Ans:-B


कोणत्या दक्षिण आशियाई देशाने चेहरा झाकणार्‍या कपड्यांवर बंदी घातली?

(A) पाकिस्तान

(B) श्रीलंका

(C) भारत

(D) बांग्लादेश

Ans:-B


चीन आणि पाकिस्तान या देशांच्या सीमेलगत  दारुगोळा साठवून ठेवण्याकरिता चार भूमिगत बोगदे तयार करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे?

(A) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

(B) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

(C) संरक्षण संशोधन व विकास संस्था

(D) राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ

Ans:-D


बॉलीवुडच्या व्यक्तींपैकी कोणाला मास्टर दिनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला?

(A) सलीम खान

(B) जावेद अख्तर

(C) बोमन इरानी

(D) इरफान खान

Ans:-A


भारतीय पथकाने शीयान (चीन) येथे खेळण्यात आलेल्या ‘आशियाई कुस्ती अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत किती पदके जिंकली?

(A) 20

(B) 16

(C) 29

(D) 15

Ans:-B


कोण लंडनच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीकडून फेलोपदासाठी निवडल्या गेलेल्या प्रथम भारतीय महिला संशोधक ठरल्या?

(A) अदिती पंत

(B) टेसी थॉमस

(C) यमुना कृष्णा

(D) गगनदीप कांग

Ans:-D


त्यानआनमेन चौकामध्ये सुधारणेची मागणी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या घटनेचे हे 30 वे वर्ष आहे. पुढीलपैकी कोणत्या देशात हा विद्रोह घडला?

(A) मलेशिया

(B) रशिया

(C) चीन

(D) पाकिस्तान

Ans:-C


कोणती कंपनी 1 लक्ष कोटी डॉलरचे भागभांडवल असलेली जगातली तिसरी कंपनी बनली?

(A) अलीबाबा

(B) टेस्ला

(C) जनरल इलेक्ट्रिक

(D) मायक्रोसॉफ्ट

Ans:-D


कोणत्या भारतीय पुरुष नेमबाजाने ‘ISSF विश्वचषक 2019’ या स्पर्धेत 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?

(A) विजय कुमार

(B) गगन नारंग

(C) सौरभ चौधरी

(D) अभिषेक वर्मा

Ans:-D


कोणत्या देशाने 'आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक 2019’ या स्पर्धेत मिळविलेल्या पदकांच्या संख्येत सलग दुसर्‍यांदा अग्रस्थान मिळवले?

(A) चीन

(B) भारत

(C) जपान

(D) तैपेई

Ans:-B


कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ‘वैश्विक अन्न धोरण अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला?

(A) अन्न व कृषी संस्था (FAO)

(B) जागतिक बँक

(C) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)

(D) इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट (IFPRI)

Ans:-D


‘BCIM आर्थिक मार्गिका’ या प्रकल्पामध्ये 4 आशियाई देशांचा समावेश आहे. पुढीलपैकी कोणता देश BCIMचा भाग नाही?

(A) म्यानमार

(B) बांग्लादेश

(C) भारत

(D) मलेशिया

Ans:-D


कोणत्या शहरात पाचवी ‘आशिया-प्रशांत प्रसारण संघ (ABU) माध्यमे शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली होती?

(A) ढाका

(B) काठमांडू

(C) दिल्ली

(D) जकार्ता

Ans:-B


MBBSच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम कधीपासून शिकविला जाईल?

(A) ऑगस्ट 2020

(B) ऑगस्ट 2019

(C) ऑगस्ट 2021

(D) ऑगस्ट 2022

Ans:-B


कोणते राज्य 1 मे रोजी त्याचा स्थापना दिन म्हणून साजरा करतो? 

I. गुजरात

II. ओडिशा

III. महाराष्ट्र


(A) केवळ III

(B) केवळ II

(C) I आणि III

(D) I आणि II

Ans:-C


स्वीडीश अकॅडेमी या संस्थेचे नवीन स्थायी सचिव कोण आहेत?

(A) अगाथा क्रिस्टी

(B) मॅट्स माल्म

(C) अॅलन पॅटन

(D) एली विझेल

Ans:-B


कोणत्या ठिकाणी 30 एप्रिल रोजी ‘शांघाय सहकार संघटना (SCO) संरक्षण मंत्री परिषद’ संपन्न झाली?

(A) बिश्केक, किर्गिजस्तान

(B) दिल्ली, भारत

(C) काठमांडू, नेपाळ

(D) बिजींग, चीन

Ans:-A


कोण जपानच्या 200 वर्षांच्या इतिहासात राजसिंहासनाचा त्याग करणारे पहिले सम्राट आहेत?

(A) नारुहितो

(B) अकिहितो

(C) मासाको

(D) ऐको

Ans:-B


कोणत्या जहाजबांधणी कंपनीसोबत 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या अंतर्गत सोळा अॅंटी-सबमरीन वॉरफेअर शैलो वॉटर क्राफ्ट (ASW SWC) जहाजांसाठी करार केला गेला?

(A) कोचीन शिपयार्ड

(B) गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स

(C) (A) आणि (B)

(D) डेम्पो शिपबिल्डिंग अँड इंजीनियर्स

Ans:-C

इंग्रज अधिकारी व कामगिरी

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट*

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक.

वाऱ्याच्या खननकार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे :

अपवहन खळगे : 

वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या आघाताने खडकाचे तुकडे होऊन तसेच खड्डय़ाच्या जागी कधी पाणी साचून खडक कुजून कमकुवत होतात. हे तुकडे वाऱ्याबरोबर वाहत जाऊन तेथे खड्डे तयार होतात. या खळग्यांनाच ‘अपवहन खळगे’ असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा, आफ्रिकेतील कलहारी, आशियातील मंगोलिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया इ. वाळवंटी प्रदेशात अपवहन खळगे आहेत.

भूछत्र खडक :

वारा वाहत असताना वाऱ्याबरोबर वाळूचे अनेक कण वाहत असतात. अशा वेळी वाऱ्याच्या मार्गात एखादा शिलाखंड आल्यास व वाऱ्याची दिशा सतत बदलत राहिल्यास शिलाखंडाच्या पायथ्यापासून एक ते दीड मीटर उंचावर असलेल्या भागाची चोहोबाजूंनी घर्षणाने झीज होते. त्याला छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. अशा वैशिष्टय़पूर्ण शिलाखंडाच्या आकाराला भूछत्र खडक असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा व इराणच्या वाळवंटात मोठय़ा प्रमाणात आहेत.

झ्युजेन :

वाळवंटी प्रदेशात क्षितिजसमांतर कठीण व मृदू खडकांचे स्तर एकमेकांवर आडवे असल्यास व त्यात जोड किंवा संधी असल्यास ऊन, वारा आणि जास्तीत जास्त तापमान व कमीत कमी तापमान यामुळे जोड रुंदावत जातात. अशा वेळी कठीण खडकाची फारशी झीज होत नाही. जो आकार प्राप्त होतो, त्यास झ्युजेन असे म्हणतात. झ्युजेनची उंची साधारण ४० ते ४५ मीटपर्यंत असते. अशी भूरूपे अरेबिया, इजिप्त व लिबियाच्या वाळवंटी प्रदेशात आढळतात.

यारदांग :

वाळवंटात ज्या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक हे लंबवत स्थितीत वाऱ्याच्या दिशेला समांतर व एकानंतर एक असतील किंवा एकमेकांना समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या खननकार्यामुळे मृदू खडकाची जास्तीत जास्त झीज होऊन मृदू खडक किंवा स्तर नाहीसा होऊन यारदांग तयार होतात. अशी यारदांगे मध्य आशिया खंडातील गोबीच्या वाळवंटात, दक्षिण अमेरिकेतील अटाकामाच्या वाळवंटात आढळतात.

द्वीपगिरी :

वाळवंटी प्रदेशात एखादा चबुतरा असल्यास चबुतऱ्याच्या आजूबाजूचा भाग वाऱ्याच्या खननकार्यामुळे झिजून आतील कठीण खडकाचा उंच भाग तसाच शिल्लक राहतो. हा भाग घुमटाकार होत जाऊन वाळूच्या टेकडीसारखा दिसू लागतो. त्यांची फारशी झीज होत नाही. हे उंच व घुमटाकार आकार वाळूच्या टेकडय़ांसारखे असतात. यांनाच ‘द्वीपगिरी’ असे म्हणतात.

वाळवंटी प्रदेशात वारा आणि काही प्रमाणात पाऊस यांच्या संयुक्त कार्यामुळे द्वीपगिरीची निर्मिती होते. कलहारी वाळवंटात, नायजेरियाच्या वाळंवटात आणि ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात द्वीपगिरीची उदाहरणे आढळतात. द्वीपगिरी म्हणजे तीव्र उताराच्या टेकडय़ा होय.

मेसा व बुटे :

वाळवंटी प्रदेशात कठीण व मृदू खडकांचे थर एकमेकांवर आणि आडव्या दिशेने समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या घर्षणामुळे मृदू खडकांची झीज जास्त प्रमाणात होऊन तिथे चौकोनी टेबलासारखा भाग दिसतो. त्यास मेसा असे म्हणतात. मेसाच्या बाजू तीव्र उताराच्या असतात. मेसा या टेबलासारख्या भागावर सतत झीज होत राहिल्यास त्याचा आकार लहान ठोकळ्यासारखा दिसतो. त्यास बुटे असे म्हणतात.

पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण  माहिती

जिल्हयाचे मुख्य ठिकाण – पुणे      

क्षेत्रफळ – 15,643 चौ.कि.मी.

लोकसंख्या – 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके – 14 – जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती.

सीमा – उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा👌 जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे.

पुणे जिल्हा विशेष

‘विधेचे माहेरघर’ असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय.

राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. ‘पुण्य’ या शब्दावरून ‘पुणे’ हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते.

देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे.

पुणे जिल्ह्यातील महत्वाची स्थळे

पुणे – मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. तसेच निगडी येथे ‘अप्पूघर‘ हे करमणुकीचे केंद्र आहे.

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील ‘अप्पूघर’ हे एक करमणुकीचे केंद्र आहे.

जुन्नर – जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता.

आळंदी – हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे.

देहू – हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.

चाकण – येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे.

लोणावळा – हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत.

जेजूरी – महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे.

आर्वी – आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.

राजगुरूनगर – हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे.

भीमाशंकर – येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे.

उरुळी कांचन – येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे.

दौंड – दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते.

वालचंदनगर – येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे.

सासवड – हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.

भोर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत.

वेल्हे – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत.

वढू – येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

पौंड – हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे.

पुणे जिल्हयाची वैशिष्ट्ये

पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते.

1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे.

ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते.

पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे नागरी संकुल आहे.

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे)

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे

राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे

राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे

भूगोल प्रश्नसंच

1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?
   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.
   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.
उत्तर :- 2

2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?
   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी
   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी
   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी
   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी
उत्तर :- 2

3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?
   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत
   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 2

4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी
     केली जाते त्यास ...................... म्हणतात. 
   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती
   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व
उत्तर :- 2

5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.
    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.
         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?
   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.
   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.
उत्तर :- 2

1) योग्य जोडया लावा :
  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष
         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm
         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm
        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm
         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm
    अ  ब  क  ड
           1)  ii  i  iii  iv
           2)  iv  iii  ii  i
           3)  i  ii  iv  iii
           4)  iii  iv  i  ii
उत्तर :- 4

2) खालील विधानांचा विचार करा.
   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.
   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 3

3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ...............
     प्रसंगी येते.
   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.
   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.
उत्तर :- 2

4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.
   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994 
उत्तर :- 2

5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?
   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान
   2) जमीन आणि माती संवर्धन
   3) पिकांचे नियोजन
   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
उत्तर :- 1 

1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :
   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर
   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड
उत्तर :- 2

2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.
   1) 75      2) 79      3) 85      4) 73
उत्तर :- 1

3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला
      जात आहे ?
   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार
   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद
उत्तर :- 4

4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?
   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.
   2) पाणी साठयास सुरुवात होणे.
   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.
   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.
उत्तर :- 1

5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू
     करण्यात आले ?
   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ
उत्तर :- 3



Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...